IND vs ENG 2021: टीम इंडियासाठी खुशखबर! इंग्लंडला टक्कर देण्यासाठी बुमराह-अश्विन फिट, पहा व्हिडिओ
टीम इंडियाच्या बऱ्याच खेळाडूंना डाऊन अंडर दौऱ्यावर दुखापत झाली आहे, ज्यामुळे निवड समितीपुढे संघाची निवड करण्याची मोठी डोकेदुखी आहे. मात्र, संघाचे दोन ज्येष्ठ गोलंदाज- आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह जवळपास फिट झालेले दिसत आहेत.
IND vs ENG 2021: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौर (India Tour of Australia) आता आपल्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहचला आहे. ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) मैदानावर अंतिम दिवसाचा खेळ सुरु असून पुढील, फेब्रुवारी महिन्यापासून इंग्लंड संघ त्यांना टेस्ट आणि टी-20 मालिकेत टक्कर देण्यासाठी येत आहे. 5 फेब्रुवारीपासून भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळली जाईल. टीम इंडियाच्या (Team India) बऱ्याच खेळाडूंना डाऊन अंडर दौऱ्यावर दुखापत झाली आहे, ज्यामुळे निवड समितीपुढे संघाची निवड करण्याची मोठी डोकेदुखी आहे. मात्र, ऑस्ट्रेलियामधून टीम इंडियासाठी एक खुशखबर समोर येत आहे. संघाचे दोन ज्येष्ठ गोलंदाज- आर अश्विन (R Ashwin) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जवळपास फिट झालेले दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सिडनी टेस्ट दरम्यान या दोन्ही गोलंदाजांना दुखापत झाली होती ज्यामुळे त्यांनी मालिकेच्या अंतिम ब्रिस्बेन टेस्टमधून माघार घेतली होती. मात्र, बीसीसीआयची (BCCI) मेडिकल टीम त्यांच्या लक्ष ठेवून होती. (IND vs ENG Series 2021: टीम इंडियाला दुखापतींचं टेंशन, इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजसाठी 5 खेळाडूंची टीम इंडियात एंट्री होण्याची शक्यता)
आता गब्बा येथे दोन्ही खेळाडूंना गोलंदाजी करताना पहिले गेले जे संघासाठी दिलासादायक बाब आहे कारण लवकरच इंग्लंड संघाचा सामना करण्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे आणि हे दोन्ही खेळाडू भारतात ही मालिका जिंकण्याच्या दिशेने महत्वाची भूमिका बजावू शकतात. इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातील बीसीसीआयच्या वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती 19 जानेवारी रोजी संघाची घोषणा करणार आहे. निवड समितीत चेतन शर्मा यांच्या व्यतिरिक्त सुनील जोशी, देबाशिष मोहंती, हरविंदर सिंह आणि अबे कुरुविला यांचा समावेश आहे. दरम्यान, बीसीसीआयने स्वतः या दोन्ही गोलंदाजांचा प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
दुसरीकडे, संघातील खेळाडू 27 जानेवारीपासून बायो सिक्योर बबलमध्ये प्रवेश करतील. भारत दौऱ्यावर इंग्लंड संघ पहिले चार सामन्यांची कसोटी मालिका, त्यानंतर पाच टी-20 आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला टक्कर देईल. सध्या इंग्लड संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे जिथे त्यांनी पहिला कसोटी सामना जिंकला असून 22 ते 26 जानेवारी दरम्यान दुसरा सामना खेळला जाणार आहे.