IND vs ENG 1st Test Predicted Playing XI: टीम इंडियापुढे संघ निवडीचा पेच, इंग्लंडला लढा देण्यासाठी मैदानात उतरतील खतरनाक प्लेइंग इलेव्हन

अशास्थितीत, कर्णधार आणि व्यवस्थापनासमोर संघ निवडीचा मोठा पेच असेल. तथापि, पहिल्या कसोटीसाठी भारताला केवळ 11 खेळाडूच निवडावे लागतील, त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाचा संभाव्य इलेव्हन खालीलप्रमाणे आहे.

भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: IANS)

IND vs ENG 1st Test Predicted Playing XI: बीसीसीआयने (BCCI) 19 जानेवारी रोजी इंग्लंड (England) संघाचा टेस्ट सिरीजमध्ये टक्कर देण्यासाठी पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. भारतीय संघात (Indian Team) फारसे आश्चर्य वाटेल अशा खेळाडूंना सामील केले नाही. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज आहे तर 2017 नंतर आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी हार्दिक पांड्याही सज्ज आहे. म्हणूनच, व्यवस्थापन त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. इंग्लिश टीमविरुद्ध भारताचा संभाव्य पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेत विजयी कामगिरी केलेल्या रिषभ पंत, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही संघातील स्थान कायम ठेवले आहे. अशास्थितीत, कर्णधार आणि व्यवस्थापनासमोर संघ निवडीचा मोठा पेच असेल. तथापि, पहिल्या कसोटीसाठी भारताला केवळ 11 खेळाडूच निवडावे लागतील, त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाचा संभाव्य इलेव्हन खालीलप्रमाणे आहे. (IND vs ENG Test Series 2021: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूची मालिकेतून माघार; टी-20, वनडे बाबतीतही सस्पेन्स)

सलामी जोडी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मयंक अग्रवाल भारतीय संघासाठी प्रभावी कामगिरी करू शकला नाही. दरम्यान, शुभमन गिलने उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून रोहित शर्मा आणि गिलचा सलामीची जोडी म्हणून वापर केला. कर्णधार विराट देखील रोहित-शुभमनच्या जोडीकडून सलामीची सुरुवात करू इच्छित असेल अशास्थितीत मयंक ला पुन्हा ओपनिंग स्थान मिळताना दिसत नाही.

मिडल ऑर्डर

पुजाराच्या बचावामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना निराश केले. पुजारा संथ खेळत असताना इतर फलंदाजांनी दुसर्‍या टोकावरून त्यांच्यावर वर्चस्व राखले. विराट कोहलीने चौथ्या स्थानावर मधल्या फळीत स्थिरता वाढवेल. रहाणे आपल्या उप-कर्णधाराच्या भूमिकेत परत येईल. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाचा नेता म्हणून रहाणेने एक प्रभावी काम केले होते. पंत कदाचित आपले स्थान कायम ठेवेल. पंतपेक्षा रिद्धिमान साहा एक चांगला विकेटकीपर आहे असे अनेकांना वाटते तथापि, ऑस्ट्रेलियात पंतच्या मॅच-विनिंग कामगिरीकडे कोणी दुर्लक्ष करू शकत नाही.

अष्टपैलू

दुखापतीमुळे रविचंद्रन अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या गब्बा टेस्ट सामन्याला मुकावे लागले होते. मात्र, तो आता इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातून मैदानात उतरेल. अश्विन आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळताना दिसेल. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत वॉशिंग्टन सुंदर आपले स्थान कायम ठेवेल. सुंदर देखील तामिळनाडूमधील आहे तर, अश्विन आणि सुंदर चेपाक येथे एका कसोटी सामन्यात खेळतील.

गोलंदाज

चेपाकची खेळपट्टी पहाता टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाजांना खेळवण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे, कुलदीप यादवचा संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी न मिळालेला कुलदीप चेन्नईमध्ये कहर करण्यासाठी उत्सुक असेल. इशांत शर्मा अनुभवी ज्येष्ठ गोलंदाज म्हणून पुन्हा कमबॅक करेल, तर जसप्रीत बुमराहला दुखापतीतून सावरण्याचा आणखी थोडा वेळ मिळेल. शार्दूल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणे कठीण निर्णय असेल, पण संघ त्याच्या जागी मोहम्मद सिराजला प्राधान्य देऊ शकतात.

असा असेल इंग्लंडविरुद्ध भारताचा प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.