IND vs ENG 1st Test Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील पहिली टेस्ट कधी-कुठे कसे पाहता येणार? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast बद्दल सर्वकाही

भारत-इंग्लंड संघातील पहिला चेन्नई कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर मालिकेचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. दोन्ही संघातील ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाची असेल.

विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Live Streaming: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्ही संघात चार टेस्ट सामने खेळला जाणार आहेत, तर पहिले दोन्ही दोन्ही सामने चेन्नईच्या (Chennai) एम. ए चिदंबरम स्टेडियमवर खेळले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी पराभव केल्यावर टीम इंडिया (Team India) टेस्ट सामन्यासाठी पुन्हा एकदा मैदानावर उतरेल तर इंग्लंड संघाने नुकतंच श्रीलंकेचा 2-0 असा क्लीन-स्वीप करत मालिकेत विजय मिळवला आहे. त्यामुळे, दोन्ही संघाचा आत्मविश्वास सध्या उंचावला असेल. दरम्यान, भारत-इंग्लंड संघातील पहिला चेन्नई कसोटी (Chennai Test) सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर मालिकेचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई टेस्टसाठी काऊंटडाऊन सुरु, टीम इंडियाच्या ‘या’ 5 धडाकेबाज खेळाडूंवर लागून असेल सर्वांचे लक्ष)

दरम्यान, दोन्ही संघातील ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाची असेल. न्यूझीलंड संघाने यापूर्वी आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर आता दुसऱ्या फायनलिस्टसाठी टीम इंडिया आणि इंग्लंड संघात चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना मालिकेत मोठा विजय मिळवणे गरजेचे आहे जेणेकडून ते फायनलमध्ये स्थान पक्क करू शकतील. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडियाने विजयाच्या टक्केवारीनुसार अव्वल स्थान गाठलं असलं तरी इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने मालिका जिंकल्यास यंदा जून महिन्यात लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ते किवी संघाचा सामना करण्यासाठी पात्र ठरू शकतात. दुसरीकडे, इंग्लंड संघापुढेही अशीच स्थिती आहे. मात्र, दोन्ही संघ जर मोठ्या फरकाने विजय मिळवण्यास अपयशी राहिल्यास तिसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलिया बाजी मारेल आणि फायनलमध्ये प्रवेश करेल.

असा आहे भारत-इंग्लंड कसोटी संघ

भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, केएल राहुल, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव,  जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.

इंग्लंड: जो रुट (कॅप्टन), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ली, झॅक क्रॉली, डॅन लॉरेन्स, ऑलिव्हर स्टोन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, बेन फोक्स, क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, डॉम बेस आणि जॅक लीच.