IND vs ENG 1st Test Day 4 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील पहिली टेस्ट कधी-कुठे कसे पाहता येणार? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast बद्दल सर्वकाही
इंग्लंडविरुद्ध चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियावर फॉलोऑनचे संकट ओढावले आहे. चेपॉक स्टेडियमवरील चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:20 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात.
IND vs ENG 1st Test Day 4 Live Streaming: इंग्लंडविरुद्ध (England) चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियावर (Team India) फॉलोऑनचे संकट ओढावले आहे. तिसरा दिवशी भारतीय संघाने 74 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 257 धावा केल्या, पण फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना 378 हुन अधिक धावा करण्याची गरज आहे. म्हणजे यजमान संघाला चौथ्या दिवशी आणखी 121 धावा करण्याची गरज आहे. तिसर्या दिवशी इंग्लंडने 8 बाद 555 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली, परंतु पहिल्या सत्रात संघ 578 धावांवर ऑलआऊट झाला. चेन्नईच्या (Chennai) चेपॉक स्टेडियमवरील चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:20 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर सामन्याचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 1st Test Day 3: रिषभ पंत-चेतेश्वर पुजरा यांच्या अर्धशतकाने टीम इंडियाची गाडी रुळावर, दिवसाखेर 257 धावांवर भारताचा अर्धा संघ तंबूत)
इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 578 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संघाचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. रोहित शर्मा-शुभमन गिलची जोडी प्रभावी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. रोहित 6 आणि शुभमन 29 धावा करून परतला. कर्णधार विराट कोहली फक्त 11 धावाच करू शकला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे 1 धाव करून डोम बेसचा शिकार बनला. मात्र, रिषभ पंतने चेतेश्वर पुजारासह सूत्र आपल्या हाती घेतली तुफानी खेळी केली. दोघांमध्ये शतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला व 200 धावसंख्या गाठली. पंत 91 आणि पुजारा 73 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतले. दरम्यान, चौथ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन भारताकडून सुरुवात करतील. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सुंदर 33 आणि अश्विन 8 धावा करून खेळत होते. इंग्लडसाठी डोम बेसने 4 तर जोफ्रा आर्चरला 2 विकेट मिळाल्या.
असा आहे भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत,वॉशिंगटन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा.
इंग्लंड: जो रुट (कॅप्टन), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, डॉम बेस. जॅक लीचआणि जेम्स अँडरसन.
(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2021 08:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

