IND vs ENG 1st Test Day 4 Lunch: टीम इंडियाची शानदार सुरुवात, अश्विनचा पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला दणका
चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या काही मिनिटांपूर्वी टीम इंडियाचा पहिला डाव 337 धावांवर संपुष्टात आला. चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणाची घोषणा झाली तेव्हा दुसऱ्या डावात इंग्लंडचा स्कोर 1/1 असा होता. रविचंद्रन अश्विनने पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का दिला.
IND vs ENG 1st Test Day 4: चेन्नई कसोटी (Chennai Test) सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या लंचची घोषणा झाली आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या काही मिनिटांपूर्वी टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव 337 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडून रिषभ पंतने (Rishabh Pant) सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजाराने 73 धावा केल्या तर, वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) नाबाद 85 धावा केल्या. शिवाय, अश्विनने 31 आणि शुभमन गिलने 29 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, पाहुण्यास संघासाठी जॅक लीच, जेम्स अँडरसन, आणि जोफ्रा आर्चरला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. डोम बेसने सर्वाधिक 4 गडी बाद केले. अशाप्रकारे, इंग्लंडला (England) दुसऱ्या डावात 241 धावांची आगजादी मिळाली. चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणाची घोषणा झाली तेव्हा दुसऱ्या डावात इंग्लंडचा स्कोर 1/1 असा होता. रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) टीम इंडियासाठी दुसऱ्या डावात शानदार सुरुवात केली आणि रोरी बर्न्स (Rory Burns) शून्यावर माघारी धाडलं. डॅन लॉरेन्स आणि डॉम सिब्ली क्रीजवर खेळत आहेत. (IND vs ENG 1st Test Day 4: टीम इंडियाचा पहिल्या डावात 337 धावांवर 'पॅकअप', वॉशिंग्टनचे ‘सुंदर’ अर्धशतक; इंग्लंडची 241 धावांची आघाडी)
टीम इंडियाने चौथ्या दिवशी 6 बाद 257 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. संघाचा डाव पुढे नेट सुंदरने 82 चेंडूत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. चौथ्या दिवसाच्या सावध सुरुवातीनंतर टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्या. सुंदर आणि आर अश्विनमध्ये भागीदारी होत असताना भारतीय फिरकीपटू वैयक्तिक 31 धावांवर जॅक लीचचा शिकार बनला. शाहबाझ नदीम भोपळा न फोडता माघारी परतला. यानंतर, बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर जेम्स अँडरसनला पहिली विकेट मिळाली. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या इशांत शर्माला इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने झेलबाद करत माघारी धाडलं. इशांतने 11 चेंडूत 4 धावा केल्या. यापूर्वी, भारताकडून रोहित शर्माने 6, कर्णधार विराट कोहली 11 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे 1 धाव करून स्वस्तात माघारी परतल्यामुळे संघ अडचणीत आला होता. पण, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या शतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला.
दुसरीकडे, इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्टात आला. संघाकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक 218 धावांची खेळी केली तर डोमिनिक सिब्लीने 87 आणि बेन स्टोक्सने 82 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.