IND vs ENG 1st Test Day 3: जो रूटची द्विशतकी खेळी, भारतीय गोलंदाज हतबल; इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्टात
ए.स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला 578 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडून आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर पाहुण्या संघासाठी कर्णधार जो रूटने द्विशतकी खेळी केली. रूटने सर्वाधिक 218 धावा केल्या.
IND vs ENG 1st Test Day 3: चेन्नईच्या (Chennai) एम. ए.स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा (England) पहिला 578 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडून (Team India) आर अश्विन (R Ashwin) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर पाहुण्या संघासाठी कर्णधार जो रूटने (Joe Root) द्विशतकी खेळी केली. रूटने सर्वाधिक 218 धावा केल्या तर डोम सिब्ली आणि बेन स्टोक्सने त्याला चांगली साथ दिली ज्यामुळे संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला. सिब्लीने 87 आणि स्टोक्सने 80 धावांचे योगदान दिले. ओली पोपने 34, रोरी बर्न्सने 33 आणि जोस बटलरने 30 धावा केल्या. डोम बेसने 34 धावा केल्या. संघ अडचणीत असताना रूटने पहिले सिब्ली आणि स्टोक्ससह मोठी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. भारताचे फिरकी गोलंदाज इंग्लंडच्या धावगतीला वेसण घालण्यात अपयशी ठरले आणि धावा लुटवल्या. शाहबाझ नदीमने सर्वाधिक 167 तर आत अश्विनने 132 धावा लुटवल्या. वॉशिंग्टन सुंदरने 98 धावा दिल्या आणि त्याला अद्याप एकही विकेट मिळाली नाही. (IND vs ENG 1st Test 2021: Rohit Sharma याने हरभजन सिंहच्या गोलंदाजीची केली नक्कल, पाहून तुम्ही देखील व्हाल रोमांचित Watch Video)
रोरी बर्न्स आणि डोम सिब्ली यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 63 धावांची भागीदारी झाली असताना अश्विनने बर्न्सला माघारी धाडलं. त्यानंतर बुमराहने इंग्लंडला दुसरा झटका देत डॅन लॉरेन्स भोपळाही फोडू न देता पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. मात्र, कर्णधार रूट आणि सिब्ली यांनी संयमी खेळी आर्त तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या 250 पार नेली. यादरम्यान दोघांनी अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर, रूटने गियर बदलला आणि बघताच शतकी धावसंख्या गाठली. रूट इथेच थांबला नाही. त्यानंतर त्याने सलग तिसऱ्यांदा 150 आणि सलग दुसरे द्विशतक ठोकले. स्टोक्सने आक्रमक भूमिका घेत त्याला चांगली साथ दिली आणि शतकी भागीदारी करत संघाला 350 पार नेलं. यानंतर पोपने देखील रूटसह 86 धावांची भागीदारी केली. अश्विनने ही जोडी फोडली आणि पोपला माघारी धाडलं. त्यानंतर पाहुण्या संघाचे विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले.
नदीमने रूटला पायचीत करत त्यांच्या द्विशतकी खेळी संपुष्टात आणली. इशांत शर्माने सलग चेंडूवर बटलर आणि जोफ्रा आर्चरला बाद करत संघाला दिलासा मिळवून दिला.