IND vs ENG 1st Test Day 3: टीम इंडियाचं दणक्यात कमबॅक; टी ब्रेकपर्यंत इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत, भारताविरुद्ध 360 धावांनी आघाडी

दुसऱ्या सत्रात फलंदाजीला आलेल्या पाहुण्या संघाला भारतीय गोलंदाजांनी बॅकफूटवर ढकललं. दुसऱ्या सत्रात रविचंद्रन अश्विनने 3 तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 गडी बाद केला. जो रूटने 40 धावा केल्या.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Getty)

IND vs ENG 1st Test Day 3: इंग्लंड (England) संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना चहापानापर्यंत 5 विकेट्स गमावून 119 धावा केल्या असून संघाने 360 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सत्रात फलंदाजीला आलेल्या पाहुण्या संघाला भारतीय (India) गोलंदाजांनी बॅकफूटवर ढकललं. अशास्थितीत, पहिल्या जोस बटलर (Jos Buttler) 14 धावा आणि ओली पोप (Olie Pope) 18 धावा करून संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसऱ्या सत्रात रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) 3 तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाहुण्या संघाच्या पहिल्या डावातील द्विशतकवीर कर्णधार जो रूटने 40 धावा केल्या. डॅन लॉरेन्स 18 आणि डोम सिब्ली 16 धावाच करू शकले. यापूर्वी, टीम इंडियाचा पहिला डाव 337 धावांवर संपुष्टात आहे ज्यामुळे, इंग्लंडला दुसऱ्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली. डोम बेस 4 विकेट घेत संघाचा यशस्वी गोलंदाज ठरला. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर आणि जॅक लीच यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाले. (IND vs ENG 1st Test 2021: कसोटी क्रिकेटमध्ये R Ashwin याची कमाल, 100 वर्षात कोणालाही न जमलेला केला कीर्तिमान, जाणून व्हाल गर्वित)

दुसऱ्या डावात 241 धावांची आघाडी घेत फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला अश्विनने पहिल्याच चेंडूवर धक्का दिला. अश्विनने रोरी बर्न्सला अजिंक्य रहाणेच्या कॅच आऊट केलं. त्यानंतरही, अश्विनने डॉम सिब्लीला चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट करत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. सिब्लीने 37 बोलमध्ये 16 धावा केल्या. इशांत शर्माने शर्माने डॅन लॉरेन्सला अधिक काळ मैदानावर टिकू दिलं नाही 47 चेंडूत 1 चौकारसह 18 धावा करत एलबीडब्ल्यू माघारी धाडलं. अश्विनने पुन्हा एकदा इंग्लिश संघाला धक्का देत आक्रमक फलंदाज बेन स्टोक्सला रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं आहे. स्टोक्स 7 धावाच करू शकला. बुमराहनेही इंग्लंडच्या संकटात वाढ करत कर्णधार रूटचा डाव स्वस्तात संपुष्टात आणला.

दुसरीकडे, इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या होत्या. कर्णधार रुटने पुढाकार घेत सर्वाधिक 218 धावांची खेळी केली तर डॉम सिब्लीने 87 आणि स्टोक्सने 82 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.