IND vs ENG 1st Test 2021: Virat Kohli आणि Rohit Sharma यांच्यासह चेपॉकच्या मैदानात उतरले खेळाडू, इंग्लंडला टक्कर देण्यासाठी टीम इंडियाची तयारी सुरु, पहा Photos
सोमवारी सहा दिवसांच्या कडक क्वारंटाइन कालावधीनंतर भारत आणि इंग्लंड खेळाडू मैदानावर उतरले आणि मैदानी सत्रामध्ये भाग घेतला. या दरम्यान, टीम इंडिया खेळाडू व्यायाम करताना दिसले.
IND vs ENG 1st Test 2021: चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) 5 फेब्रुवारीपासून भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात होणार आहे. सोमवारी सहा दिवसांच्या कडक क्वारंटाइन कालावधीनंतर भारत आणि इंग्लंड खेळाडू मैदानावर उतरले आणि मैदानी सत्रामध्ये भाग घेतला. या दरम्यान, टीम इंडिया (Team India) खेळाडू व्यायाम करताना दिसले. लक्षात घेण्यासारखे म्हणजे मंगळवार म्हणजे आजपासून दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात सरावाला सुरुवात करतील. चेन्नईमध्ये (Chennai) दाखल झाल्यावर कोरोना नियमांनुसार खेळाडूंनी क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणे आवश्यक होते, त्यामुळे मागील सहा दिवस सर्व खेळाडू चेन्नईच्या ‘लीला पॅलेस’ या हॉटेलमध्ये क्वारंटाइन होते. सोमवार, 1 फेब्रुवारी रोजी हा कालावधी पूर्ण झाल्याने खेळाडूंची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात आली असून सर्व खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर भारतीय खेळाडू चेपॉकच्या मैदानात उतरलेले. (India Likely Playing XI for 1st Test vs England: रिषभ पंत-रिद्धिमान साहा, अक्षर पटेल-वॉशिंग्टन सुंदर? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियापुढे Playing XI निवडीची डोकेदुखी)
बीसीसीआयने इंस्टाग्राम अकाउंटवरून खेळाडूंच्या व्यायाम सत्राचे फोटो शेअर केले. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज मैदानात स्ट्रेचिंग करताना दिसत आहे.कोहलीसह सर्व भारतीय खेळाडूंनी आज चेन्नईमध्ये घाम गाळला आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाने कसोटी मालिकेत यजमान संघाचा 2-1 असा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. यजमान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध या यशानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. अशास्थितीत, भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून सुरु होणार्या कसोटी मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सर्व क्रिकेट तज्ञांची पहिली पसंत आहे.
दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर, मालिकेचा दुसरा सामना याच मैदानावर 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. इंग्लंड मालिकेपूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार विराट कोहलीही संघात सामील झाला आहे. यापूर्वी, विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यानंतर पितृत्व रजेवर मायदेशी परतला होता.