IND vs ENG 1st Test 2021: ‘याला सेलिब्रेशन म्हणतात’! बेअरस्टोला बाद केल्यानंतर Mohammed Siraj ने दाखवला स्वॅग (Watch Video)

दुसऱ्या डावातील मोहम्मद सिराजचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सिराज विकेट घेतल्यानंतर आनंदी शैलीत दिसत आहे. जॉनी बेअरस्टोच्या बाद झाल्यानंतर सिराज आंनद साजरा करत असलेल्याचा हा व्हिडिओ आहे.

मोहम्मद सिराज, जॉनी बेअरस्टो (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 1st Test 2021: नॉटिंगहमच्या (Nottingham) ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जाणारा भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पहिला कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात फलंदाजी करत 303 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियाला 209 धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने चमकदार कामगिरी बजावली व पाच ब्रिटिश फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. या सामन्याबद्दल बोलायचे तर दुसऱ्या डावातील मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सिराज विकेट घेतल्यानंतर आनंदी शैलीत दिसत आहे. जॉनी बेअरस्टोच्या (Jonny Bairstow) बाद झाल्यानंतर सिराज आंनद साजरा करत असलेल्याचा हा व्हिडिओ आहे. (IND vs ENG 1st Test Day 4: जो रूटचे शानदार, बुमराहचा 'पंच', पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे टीम इंडियाला 209 धावांचे टार्गेट)

सिराज इंग्लंडच्या डावातील 58वी ओव्हर टाकण्यासाठी आला आणि ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर बेअरस्टो पूल-शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाउंड्री लाईनवर रवींद्र जडेजाकडे झेलबाद झाला. जडेजाने झेल पकडल्याचे सिराजला समजताच तो पूर्ण उत्साहात दिसला आणि त्याने बेअरस्टोला तोंडावर बोट ठेवून जबरदस्त अंदाजात सेंड-ऑफ दिला. सिराजचा हा उत्साह पाहून संपूर्ण टीम उत्साहाने भरून गेली आणि टीम इंडियाने या विकेटनंतर आणखी दोन विकेट घेत मॅचमध्ये पुनरागमन केले. रोरी बर्न्स आणि क्रॉलीला लवकर बाद केल्यानंतर सिब्ली आणि जो रूटने 89 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत यजमान संघाचा डाव सावरला. त्यानंतर, जो रूट आणि बेअरस्टोने त्यांच्या अनुभवासह संघाची आघाडी वाढवण्यास मदत केली. पण बेअरस्टोच्या विकेटने भारतीय संघात नवी ऊर्जा भरली. दरम्यान, चाहत्यांना सोशल मीडियावर सिराजचा हा व्हिडीओ खूप आवडत आहे आणि चाहतेही ते खूप शेअर करत आहेत.

दुसरीकडे, पाच सामान्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज चौथ्या दिवसाचा खेळ ट्रेंट ब्रिज येथे रंगला आहे. इंग्लंड पहिल्या डावात 183 धावांच करू शकला तर टीम इंडियाने प्रत्युत्तरात केएल राहुल व रवींद्र जडेजाच्या अर्धशतकी कामगिरीच्या 278 धावांपर्यंत मजल मारली.