IND vs ENG 3rd Test D/N 2021: तिसर्या टेस्ट सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा; दोन स्फोटक गोलंदाज करणार कमबॅक तर ‘या’ खेळाडूची होणार मायदेशी रवानगी
24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान दोन्ही संघ दिवस/रात्र कसोटी सामन्यात पहिल्यांदा आमने-सामने येतील. चेन्नई येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात थरारक कॅमिओ खेळणारा अष्टपैलू मोईन अली ब्रेकसाठी मायदेशी परतणार आहे.
IND vs ENG 3rd Test D/N 2021: अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) भारताविरुद्ध (India) होणाऱ्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यासाठी पाहुण्या इंग्लंड (England) संघाने 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान दोन्ही संघ दिवस/रात्र कसोटी (D/N Test) सामन्यात पहिल्यांदा आमने-सामने येतील. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जाहीर केल्या नुसार चेन्नई (Chennai) येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात थरारक कॅमिओ खेळणारा अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) ब्रेकसाठी मायदेशी परतणार आहे. फिरकीपटू मोईनने दुसऱ्या कसोटी सामन्यात एकूण 8 विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात तुफानी 43 धावा केल्या. इंग्लंडचा हा फिरकीपटू पहिल्याच नाही तर चौथ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला आहे. त्याचबरोबर रोटेशन सिस्टममुळे यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरलाही बाहेर करण्यात आले आहे. विकेटकीपर-फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) इंग्लंडच्या संघात परतला आहे, तर मार्क वुड आणि जॅक क्रोलीचाही समावेश झाला आहे. (IND vs ENG 2nd Test 2021: Chepauk वर विजयानंतर रोहित-विराटचा हा व्हिडिओ वर्षानुवर्षे राहील चाहत्यांच्या स्मरणात, टीम इंडियाने अशाप्रकारे केले सेलिब्रेट)
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बेअरस्टो आणि वुड यांना विश्रांती देण्यात आली होती. शिवाय, तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडची वेगवान जोडी जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) देखील परतले आहेत. आर्चरला दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडावे लागले होते तर अँडरसन देखील बाहेर बसला होता. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध पहिल्या आणि दुसर्या कसोटी सामन्यात अपसायही ठरलेल्या रोरी बर्न्स, डोम सिब्ली आणि डॅन लॉरेन्स यांना संघात कायम ठेवले आहे. मंगळवारी एम. ए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
तिसर्या कसोटीसाठी इंग्लंड संघ: जो रूट (कॅप्टन), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डोम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.