IND vs BAN Test 2019: ईडन गार्डन्सवर BCCI खेळवू शकते पहिली Day/Night टेस्ट मॅच, बांग्लादेश बोर्डला दिला प्रस्ताव

भारत-बांग्लादेश संघातील दुसरा टेस्ट सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

ईडन गार्डन्स (Photo Credit: WikiMedia)

बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध होणाऱ्या आगामी टेस्ट मालिकेतील कोलकातामधील दुसरी टेस्ट मॅच डे/नाईट खेळवण्याचा प्रस्तावभारतीय क्रिकेट मंडळने (बीसीसीआय) बांग्लादेश क्रिकेट बोर्डला दिला आहे. भारत (India)-बांग्लादेश संघातील दुसरा टेस्ट सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. बीसीबी (BCB) क्रिकेट ऑपरेशनचे अध्यक्ष अक्रम खान यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले की, "त्यांनी (बीसीसीआय) आम्हाला (डे-नाईट टेस्ट) प्रस्ताव दिला आहे आणि त्याबद्दल चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना कळवू." बांग्लादेश बोर्डने जर प्रस्ताव मान्य केला  तर,भारतीय संघाचा पहिला दे-नाईट सामना ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. बीसीबीयाबाबत येत्या एक-दोन दिवसात निर्णय घेण्याचे समजले जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी डे-नाईट मॅचच्या पक्षात भाष्य केले होते. (IND vs BAN T20I: बांग्लादेश टी-20, टेस्ट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; विराट कोहली याला टी-20 साठी विश्रांती)

गांगुली म्हणाले की, डे/नाईट टेस्ट मॅचला भविष्यासाठी अनुकूल असे म्हटले होते. शिवाय, कर्णधार विराट कोहली यानेदेखील या कसोटी खेळण्याच्या कल्पनेशी सहमती दर्शवली आहे. दरम्यान, भारत आणि बांग्लादेश संघात दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जाणार आहे. यातील दुसरी मॅच ईडन गार्डन्समध्ये होणार आहे. या मॅचसाठी बीसीसीआयने बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आमंत्रण दिले आहे. आणि त्यांनी ते स्वीकारदेखील केले आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात नोव्हेंबरमध्ये तीन सामन्यांची टी -20 आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जातील. गुरुवारी भारतीय संघाची टी-20 आणि टेस्ट मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. टी-20 मालिकेसाठी विराट कोहली (Virat Kohli) याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे, त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा याच्याकडे टी-20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.