IND vs BAN 1st Test: रवींद्र जडेजा याने शानदार फिल्डिंगद्वारे केली कमाल, रॉकेट थ्रो ने केले तैजुल इस्लामला रन आऊट, पाहा Video
जडेजा खूप चांगले क्षेत्ररक्षण करतो आणि बांग्लादेशविरुद्ध टेस्ट सामन्यात त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. बांग्लादेश संघाने 8 गडी गमावले असताना फलंदाजी करताना जडेजाच्या हातात बॉल असतानाही तैजुल इस्लामने दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न केला. जडेजाने रॉकेटच्या गतीने चेंडू फेकला आणि तैजुल धावबाद झाला.
क्रिकेट विश्वात फिल्डिंगची पातळी आता बरीच वाढली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलूं रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम क्षेत्ररकांपैकी एक मानला जातो. जडेजा खूप चांगले क्षेत्ररक्षण करतो आणि बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध इंदोरमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सामन्यात त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. या सामन्यात जडेजाची चांगली धावपळ झालेली पाहायला मिळाली. बांग्लादेशने 8 विकेट गमावले असताना जडेजाकडून शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. बांग्लादेश संघाने 8 गडी गमावले असताना फलंदाजी करताना जडेजाच्या हातात बॉल असतानाही तैजुल इस्लाम (Taijul Islam) याने दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न केला. तैजुलच्या या प्रयत्नाला जडेजाने चुकीचा ठरवले. तैजुल 1 धाव करत माघारी परतला. जडेजाने त्याच्या फिल्डिंगद्वारे प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. (IND vs BAN 1st Test: उत्साही चाहत्यांनी विराट कोहली याचे ऐकले आणि मोहम्मद शमी याने घेतली आणखी एक विकेट, पाहा Video)
जडेजाने एकही सेकंद न गमावता यष्टीरक्षक रिद्धिमान साहा यांच्याकडे रॉकेटच्या गतीने चेंडू फेकला आणि तैजुल धावबाद झाला. मात्र, सामन्यात गोलंदाज जडेजाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने या डावात फक्त 3 ओव्हर टाकले, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. शिवाय, अन्य फिल्डर्सदेखील प्रभाव पडण्यास अपयशी दिसले. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांने काही महत्वपूर्ण आणि सोपे कॅच सोडले.
भारतीय संघ आणि बांग्लादेशमधील पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार मोमीनुल हक याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्याला भारतीय गोलंदाजीमुळे चुकीचे ठरवले. बांग्लादेशकडून झालेल्या सामन्यात कर्णधार मोनिमुलने 37 धावा आणि अनुभवी मुशफिकुर रहीम याने 43 धावा केल्या. यानंतर बांग्लादेशचा संपूर्ण संघ 150 धावांवर बाद झाला. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने 3 गडी बाद केले तर आर अश्विन, उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांनी 2-2 गडी बाद केले.