IND vs BAN Day-Night Test 2019: अजिंक्य रहाणे याला पडले पिंक बॉलचे स्वप्न, विराट कोहली-शिखर धवन यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया, पाहा Tweet

या फोटोत रहाणे पिंक बॉल बाजूला घेऊन झोपलेला दिसत आहे. रहाणेच्या या पोस्टवर कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी रहाणेची फिरकी घेण्याची साधी सोडली नाही आणि मजेदार प्रतिक्रिया देत त्यालाच ट्रोल केले.

शिखर धवन आणि विराट कोहली, अजिंक्य रहाणे (Photo Credit: Instagram)

भारतीय संघ (Indian Team) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात 22 नोव्हेंबरपासून ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट सामना खेळला जाणार आहे दोन्ही संघासाठी हा महत्वाचा क्षण असेल कारण हे संघ पहिल्यांदा पिंक बॉलने डे-नाईट टेस्ट खेळणार आहेत. कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्सवर भारत-बांग्लादेशमध्ये दोन टेस्ट सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना खेळला जाईल. या टेस्टसाठी भारतीय खेळाडूंनी उत्सुकता पहिली जात आहे. यामध्ये भारताच्या टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील मागे नाही. ऐतिहासिक गुलाबी बॉलमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे चाहते आणि भारतीय संघातील खेळाडूही खूप उत्सुक आहेत. (IND vs BAN Day-Night Test: रविचंद्रन अश्विन याने नेट्समध्ये सरावादरम्यान केली सनथ जयसूर्या याच्या गोलंदाजीची नकल, व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध दुसरा सामना हा भारताचा 540 वा कसोटी सामना असेल. यामुळे सर्व खेळाडू उत्साहात दिसत आहे. आणि भारताचा कसोटी विशेषज्ञ रहाणेला तर पिंक बॉलचे स्वप्ने पडत आहेत. रहाणेने सोशल मीडिया साईट इंस्टाग्राम एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रहाणे पिंक बॉल बाजूला घेऊन झोपलेला दिसत आहे. रहाणेच्या या पोस्टवर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनीही मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोघांनी रहाणेची फिरकी घेण्याची साधी सोडली नाही आणि मजेदार प्रतिक्रिया देत त्यालाच ट्रोल केले. कोहलीने रहाणेच्या या फोटोवर  लिहिले, 'छान पोज जिंसी', धवनने लिहिले की तो फोटो स्वप्नात घेण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

Already dreaming about the historic pink ball test 😊

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

डे-नाईट कसोटी सामना 2015 मध्ये आधीच सुरू झाला होता, परंतु गुलाबी बॉलने कसोटी सामना खेळण्याचे स्वप्न पूर्ण करणार असलेल्या भारतीय संघाला तोपर्यंत पूर्ण करता आला नाही. आजवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे  आणि श्रीलंका संघ पिंक बॉलने टेस्ट सामना खेळले आहेत. दरम्यान, दोन्ही संघातील या सामन्याला संस्मरणीय बनवण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली खूप तयारी करत आहेत. हा डे-नाईट सामना दररोज दुपारी 1 वाजता सुरू होईल. या सामन्याबद्दल लोकं खूप उत्सुक आहेत आणि पहिल्या तीन दिवसांमध्ये सुमारे 50 हजार प्रेक्षक ईडन गार्डनमध्ये उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, ज्यांची तिकिटे आधीच विकली गेली आहेत.