IND vs BAN 2nd Pink Ball Test: विराट कोहली-अजिंक्य रहाणे यांच्या जोडीची कमाल, सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर यांना मागे टाकत बनले नंबर 1

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी मिळून टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. कोहली आणि रहाणे आता मिसब उल-हक आणि युनूस खान यांच्या मागे आहेत. कोहली-रहाणेने केवळ 42 डावांमध्ये 2763 धावा तर इंझमाम आणि युसूफने 50 डावात 2677 धावा केल्या आहेत.

अजिंक्य रहाणे-विराट कोहली (Photo Credit: IANS/Getty Images)

भारतीय कसोटी संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोघांनी मिळून टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात विराट आणि अजिंक्यने चौथ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. यासह, कसोटी सामन्यांमध्ये चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीची नोंद या दोघांच्या जोडीने केली. दुसर्‍या दिवशी भारताच्या जोडीने बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन करत भारताला पहिल्या डावात 347 धावांचा टप्पा गाठण्यात महत्वाची भूमिका बजावली. कोहलीने 27 वे टेस्ट शतक केले आणि 136 धावांवर कॅच आऊट झाला. दुसरीकडे, रहाणेनेदेखील विराटला चांगली साथ देत 69 चेंडूत 51 धावा केल्या. या भागीदारीसह कोहली आणि रहाणेने पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हक आणि मोहम्मद यूसुफ, टीम इंडियाचे सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), श्रीलंकेचे महेला जयवर्धने आणि थिलन समरवीराला मागे टाकले आणि कसोटी क्रिकेटमधील चौथ्या विकेटसाठी दुसरे सर्वाधिक धावांच्या भागीदारीची नोंद केली. (IND vs BAN 2nd Pink Ball Test: विराट कोहली-इशांत शर्मा यांचा प्रभावी मारा, दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडिया विजयापासून 4 विकेट दूर)

कोहली आणि रहाणे आता मिसब उल-हक आणि युनूस खान यांच्या मागे आहेत. कोहली-रहाणेने केवळ 42 डावांमध्ये 2763 धावा तर इंझमाम आणि युसूफने 50 डावात 2677 धावा केल्या आहेत. गांगुली आणि तेंडुलकरचे 45 डावात 2695. धावा, जयवर्धने आणि समरवीराने 46 डावांमध्ये 2710 धावांची भागीदारीची नोंद केली आहे. यासह विराट-रहाणे याबाबतीत भारताची नंबर एकची जोडी बनली आहे.

दरम्यान, या ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियाचे मजबूत स्थितीत आहे. भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशचा पहिला डाव 106 धावांवर गुंडाळला होता, त्यानंतर कोहलीचे शतक आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि रहाणेच्या अर्धशतकांसह भारताने पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित केला होता. याच्यानंतर, टीम इंडिया आता दुसऱ्या सामन्यात विजयापासून अवघे 4 विकेट दूर आहे. बांग्लादेश भारताच्या पहिला डावाच्या अजून 89 धावा मागे आहे. भारताने डाव घोषित केल्यावर इशांत शर्मा (Ishant Sharma) याने दुसऱ्या दिवसाखेरीस 4, तर उमेश यादव (Umesh Yadav) याने 2 गडी बाद करत भारताचा विजय निश्चित केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now