IND vs AUS CWC 2019 सामन्यादरम्यान ट्विटर युजर्सचा अॅडम झॅम्पा याच्यावर Ball Tampering चा संशय (Watch Video)

मात्र सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मैदानावर केलेल्या काही गोष्टी संशयास्पद जाणवल्या.

Adam Zampa | File Image | (Photo Credits: Getty Images)

आईसीसी वर्ल्ड कप 2019 (ICC World Cup 2019) मधील काल झालेल्या भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) सामन्यात भारताने 5 विकेट गमावत 352 धावा केल्या. त्यानंतर 353 धावांचे टीम इंडियाने दिलेले लक्ष्य साध्य करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले नाही आणि भारताचा 36 धावांनी विजय झाला. मात्र सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मैदानावर केलेल्या काही गोष्टी संशयास्पद जाणवल्या. याचे व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत अॅडम झॅम्पा (Adam Zampa) दिसत असून तो हेडबँड घालतो आणि मग आपला हात खिशात टाकतो. त्यानंतर बॉल घासताना दिसत आहे. त्याच्या या कृतीवर संशय व्यक्त केला जात आहे. (ऑस्ट्रेलिया वर टीम इंडिया ची 36 धावांनी विजय; शिखर धवन ठरला 'मॅन ऑफ द मॅच')

ट्विटर युजर्सने अॅडम झॅम्पावर बॉल टेपरिंचा (Ball Tampering) आरोप केला आहे. अॅडम सतत हात खिशात टाकत असल्याने युजर्सने संशय व्यक्त केला आहे. काही लोक अॅडम झॅम्पा याने खिशात सँडपेपर ठेवल्याचे बोलत आहेत. अद्याप आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र नेटकऱ्यांनी केलेले हे ट्विट्स पहा....

कालच्या सामन्यात अॅडम झॅम्पा काही खास कमाल करु शकला नाही. त्याने 6 ओव्हर्समध्ये 50 धावा दिल्या. त्याचबरोबर एकही विकेट घेण्यात त्याला यश आले नाही. यापूर्वी बॉल टेपरिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वार्नर यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली होती.



संबंधित बातम्या