IND vs AUS 1st Test Day 3 Stats: टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवाने विराट कोहलीची 'ती' मालिका खंडित, पाहा पिंक-बॉल टेस्टच्या तिसऱ्या दिवसाचे प्रमुख आकडे

या सामन्यात टीम इंडियाने कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचा नाकारून अनेक लज्जास्पद विक्रम नोंदवले. दरम्यान, पहिल्या कसोटीच्या आकडेवारीवर नजर टाकूया.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st Test 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात कोणताही भारतीय (India) फलंदाज दुहेरी आकडा स्पर्श करु शकला नाही आणि पहिल्या डावात 53 धावांची आघाडी मिळविल्यानंतरही संघाने कांगारू संघासमोर 90 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचा नाकारून अनेक लज्जास्पद विक्रम नोंदवले. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा डाव अवघ्या 36 धावांत गुंडाळला आणि तिसऱ्या दिवशीच सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वत कमी धावसंख्या ठरली, तर यापूर्वी 1974मध्ये इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स (Lords) टेस्टच्या तिसऱ्या डावात टीम इंडियाने 42 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने सलामी फलंदाज जो बर्न्सच्या (Joe Burns) नाबाद 51 आणि मॅथ्यू वेडच्या 33 धावांच्या जोरावर सहज विजय मिळवला. भारताविरुद्ध या विजयाने कांगारू संघाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (Lowest Score in Test Cricket: Lowest Score in Test Cricket:ऑस्ट्रेलिया समोर टीम इंडीया गारद; 46 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतकी लाजिरवाणी कामगिरी)

दुसऱ्या डावात मोहम्मद शमीला दुखापत झाल्याने भारताने 9 बाद 36 धावांवर डाव घोषित केला. दरम्यान, पहिल्या कसोटीच्या आकडेवारीवर नजर टाकूया.

1. मयंक अग्रवाल भारतासाठी सर्वात जलद 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. मयंकने अवघ्या 19 डावात हा पराक्रम केला, तर भारतासाठी सर्वात जलद 1000 धावा करण्याचा रेकॉर्ड विनोद कांबळीच्या नावावर आहे ज्याने हा एकदा गाठण्यासाठी 14 डाव खेळले.

2. भारताच्या आघाडी फलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्या पॅट कमिन्सने पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात चार विकेट्स घेतल्या. नुकत्याच संपुष्टात आलेल्या पहिल्या कसोटीत सात विकेट घेत कमिन्सने कसोटी क्रिकेटमधील वेगवान 150 विकेटच्या यादीत ऑस्ट्रेलियाकडून संयुक्तपणे दुसरे स्थान मिळविले आहे.

3. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दुसऱ्यांदा विराट कोहली एका कॅलेंडर वर्षात शतक ठोकण्यात अपयशी ठरला आहे. विराटने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि 2020 पूर्वी 2008 हे एकमेव वर्ष होते जेव्हा विराटची बॅट शांत राहिली होती.

4. कसोटी क्रिकेटच्या 143 वर्षांच्या इतिहासातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा संघातील सर्व खेळाडू दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. तत्पूर्वी, इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला 30 धावांवर बाद केले आणि हर्बी टेलरने सर्वाधिक 7 धावा केल्या, तरीही डावात 11 अतिरिक्त धावा मिळाल्या होत्या.

5. डे-नाईट कसोटीच्या तिसर्‍या दिवशी भारताचा दुसरा डाव फक्त 36 धावांवर घसरला. भारताच्या 88 वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात कमी धावा आहे. शिवाय, पिंक-बॉल टेस्टमधील एखाद्या संघाने नोंदवलेली सर्वात कमी धावसंख्या देखील आहे.

6. हनुमा विहारीला बाद करत 200 कसोटी विकेट घेणारा जोश हेजलवुड 18वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला. हेझलवूडने दुसऱ्या सामन्यात अवघ्या 8 धावा देत 5 विकेट घेतल्या.

7. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला पराभव आहे. शिवाय, विराटच्या नेतृत्वात संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. यापूर्वी, न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाला दोन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप पत्करावा लागला होता.

आता 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ मेलबर्नसाठी रवाना होतील. भारतीय कर्णधार विराट कोहली आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मानिमित्त मायदेशी परतणार असल्याने उर्वरित सामन्यात तो भाग घेऊ शकणार नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल.