IND vs AUS 1st ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि TV Telecast ची संपूर्ण माहिती

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आजचा सामना खेळला जाईल. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. या शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल.

IND vs AUS 1st ODI Live Streaming: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील पहिला वनडे सामन्याला आज, 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहेत. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) आजचा सामना खेळला जाईल. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील हा पहिला सामना असेल. मार्च महिन्यात कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर ब्रेक लागल्यानंतर भारतीय संघाचा (Indian Cricket Team) हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल तर ऑस्ट्रेलिया संघाने (Australian Cricket Team) यापूर्वी इंग्लंड दौऱ्यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात खेळी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल, पण घरच्या मैदानावर खेळणारा ऑस्ट्रेलिया देखील मजबूत संघ आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणारा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:10 वाजता सुरु होईल तर नाणेफेक 8:40 मिनिटांनी होईल. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. या शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. (IND vs AUS 2020-21: विराट कोहलीने पहिल्या वनडेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला दिली वॉर्निंग, नेट्समध्ये केली हिटमॅन स्टाइल फटकेबाजी, पहा Video)

दरम्यान, भारतीय संघात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामी जोडी कोणती असेल यावर संभ्रम अजूनही कायम आहे. शिखर धवनसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी भारतीय संघात केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल सारखे फलंदाज उपलब्ध आहेत, पण अखेरीस संधी कोणाला मिळते हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे. शिवाय, भारताविरुद्ध यंदा ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरची जोडी देखील खेळताना दिसणार आहे. भारताच्या 2018-19 ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान दोघांवर बॉल-टॅम्परिंग प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती, ज्यामुळे दोघांना मालिकेला मुकावे लागले होते. पण आता दोन्ही फलंदाज संघात परतल्यामुळे यंदाची मालिका मनोरंजक होणार हे नक्की. दोन्ही देशांमधील वनडे मालिका आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग अंतर्गत खेळली जाईल.

पाहा ऑस्ट्रेलिया आणि भारत वनडे संघ

ऑस्ट्रेलिया वनडे टीम: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन , ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झांपा, जोश हेजलवुड, अ‍ॅश्टन अगर, मोइसेस हेनरिक्स, मॅथ्यू वेड, सीन अ‍ॅबॉट, अँड्र्यू टाय, कॅमरून ग्रीन आणि डॅनियल सॅम्स.

भारतीय वनडे टीम: शिखर धवन, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.