IPL 2023 Playoffs: आज मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही संघांनी विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये कोणाला मिळेल स्थान, जाणून घ्या संपूर्ण समीकरण
सनरायझर्स हैदराबाद संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. दोन्ही संघांना त्यांचा शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 13 सामन्यांत 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (LSG vs KKR) 1 धावेने पराभव करत प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. आता टॉप-4 मध्ये 1 संघासाठी फक्त एकच जागा शिल्लक आहे आणि त्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. दोन्ही संघांना त्यांचा शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 13 सामन्यांत 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघही या गुणांसह 7व्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नेट रन रेट सध्या खूप चांगला आहे आणि त्यामुळे गुण समान असूनही ते मुंबई इंडियन्सपेक्षा वर आहेत. पण जर दोन्ही संघांनी शेवटचा साखळी सामना जिंकला तर कोणत्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. असा प्रश्न सर्व चाहत्यांच्या मनात येत आहे.
आरसीबीचा आहे वरचष्मा
मुंबई इंडियन्सला त्यांचा शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांच्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर खेळायचा आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. जेणेकरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून नेट रनरेट सुधारता येईल. दुसरीकडे, जर मुंबई इंडियन्स असे करण्यात यशस्वी झाले नाहीत आणि आरसीबीने गुजरात टायटन्सविरुद्धचा शेवटचा साखळी सामना जिंकला तर ते प्लेऑफसाठी सहज पात्र ठरतील.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. अशा परिस्थितीत आरसीबीला या सामन्यात कोणत्या रणनीतीने खेळायचे आहे हे आधीच कळेल. (हे देखील वाचा: Viral Video: रोहित शर्माला चाहत्याने केली किस करण्यासाठी विनंती; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय हा व्हिडिओ, Watch)
आरसीबीचा सध्या निव्वळ रन रेट 0.180 आहे. आणि मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट -0.128 आहे. जर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांनी आज आपले सामने जिंकले, तर ज्या संघाचा निव्वळ धावगती चांगला असेल तो प्लेऑफमध्ये पोहोचेल आणि लखनऊ सुपर जायंट्ससोबत एलिमिनेटर सामना खेळेल.