ICC World Test Championship: केन विल्यमसन टीम इंडियाविरुद्ध WTC फायनल सामन्यासाठी उपलब्ध असणार? किवी फलंदाजाने दिला दुखापतीचा अपडेट
वॅटलिंग यांची प्रकृती चांगली झाली आहे, आणि दोघे 18 जूनपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यासाठी उपलब्ध होतीलअसा विश्वास न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम यांनी व्यक्त केला आहे. विल्यमसन-वॉटलिंगशिवाय न्यूझीलंडने टिम साउदी आणि काईल जेमीसन यांना विश्रांती दिली होती.
ICC World Test Championship: कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) आणि यष्टीरक्षक फलंदाज बी.जे. वॅटलिंग (BJ Watling यांची प्रकृती चांगली झाली आहे, आणि दोघे 18 जूनपासून हॅम्पशायर बाऊल (Hampshire Bowl) येथे सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यासाठी उपलब्ध होतील असा विश्वास न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लाथम (Tom Latham) यांनी व्यक्त केला आहे. लाथमच्या नेतृत्वात किवी संघाने रविवारी दुसर्या कसोटीत यजमान इंग्लंडला आठ गडी राखून पराभूत केले आणि 1999 नंतर इंग्लंडमध्ये (England) कसोटी मालिकेतील पहिला विजय मिळवला. अनेक फ्रंटलाइन खेळाडू संघात नसताना लाथमच्या ब्लॅककॅप्सने मनोरंजक विजय मिळवला. विल्यमसन आणि वॉटलिंगशिवाय न्यूझीलंडने वेगवान गोलंदाज टिम साउदी आणि काईल जेमीसन यांना विश्रांती दिली होती. (ICC WTC Final 2021: कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये हे 7 गोलंदाज करणार धमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल)
“ते बरे झाले आहेत. त्यांच्यासाठी थोडा विश्रांती घेणे आणि पुढच्या आठवड्यात पूर्णपणे फिट होणे महत्वाचे होते, म्हणून मला खात्री आहे की पुढच्या आठवड्यात ते फिटनेस टेस्टिंग प्रोटोकॉलमध्ये जातील जेणेकरून ते खेळण्यासाठी तयार असतील. आमच्याकडे पूर्ण तंदुरुस्त संघ असेल,” इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंघम येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात विल्यम्सनच्या जागी नेतृत्व करणारा लाथम म्हणाला. एजबॅस्टन सामन्यात मॅट हेन्रीने किवी संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. विल्यमसनच्या जागी युवा फलंदाज विल यंगनेही धावा फटकावल्या.न्यूझीलंड कोणत्याही एका खेळाडूच्या कामगिरीवर विसंबून नाही, याचं कारण लाथम यांने स्पष्ट केले. शिवाय, लाथम म्हणाला की, भारत एक अष्टपैलू संघ आहे आणि डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
“[भारताकडून होणारा धोका] खरोखरच बोर्डाच्या सर्व बाजूंनी असेल. त्यांच्याकडे गोलंदाजांचा एक शानदार सेट आहे, जगभरात वेगवेगळ्या परिस्थितीत धावा काढणारे दर्जेदार फलंदाज आहेत. ते काही वर्षांपूर्वी येथे होते आणि खरोखर चांगले खेळले म्हणून आपल्याला माहित आहे की त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला खरोखरच चांगले खेळायचे आहे परंतु आमचे लक्ष काही दिवसात त्यांच्याकडे वळले जाईल आणि गेल्या दोन आठवड्यांपासून तयारी चांगली झाली नसली तरी आपणास ठाऊक आहे की पूर्णपणे वेगळ्या बाजूने खेळण्याकडे आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,” लाथम म्हणाला.