IPL Auction 2025 Live

ICC WTC 2021-23 Points Table: हेडिंग्ले टेस्ट पराभवाचा टीम इंडियाला जोरदार झटका, पाकिस्तानने काबीज केले ‘अव्व्ल’ स्थान

लीड्स कसोटीच्या पराभवाचा भारतीय संघाला टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत देखील जोरदार फटका बसला आहे आणि पाकिस्तानने अव्वल स्थान काबीज केले आहे.

विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: Twitter)

ICC WTC 2021-23 Points Table: इंग्लंड क्रिकेट संघाने (England Cricket Team) भारताविरुद्ध (India) पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी जिंकली आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत चौथे स्थान कायम ठेवले आहे. उल्लेखनीय म्हणजे, इंग्लंड संघाने भारताला एक डाव आणि 76 धावांनी पराभूत करत मालिकेतील तिसरी कसोटी सामना जिंकला. अशास्थितीत लीड्स कसोटीच्या (Leeds Test) पराभवाचा भारतीय संघाला (Indian Team) टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत देखील जोरदार फटका बसला आहे आणि पाकिस्तानने (Pakistan) अव्वल स्थान काबीज केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 ची सुरुवात झाली आणि दोन्ही संघांमधील नॉटिंगहम येथे आयोजित पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. त्यानंतर लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने (Team India) ऐतिहासिक लढा दिला आणि कसोटी सामना 151 धावांनी जिंकला. (IND vs ENG 3rd Test: लीड्स टेस्ट सामन्यात टीम इंडियाला भारी पडल्या ‘या’ 4 चुका, पहिल्या दिवशीच लिहिला गेला होता पराभव)

आता तिसऱ्या कसोटीत इंग्लिश खेळाडूंनी कडवी झुंज दिली आणि एक डाव व 76 धावांनी जिंकून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या विजयानंतर इंग्लंड संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यडचं गुणतालिकेत चौथ्या स्थानावर बसला आहे. दुसरीकडे, टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर घसरली आहे आणि पाकिस्तान आता गुणतालिकेत आघाडीवर पोहचला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, टीम इंडियाला मोठा धक्का बाळा आणि पहिल्या दिवशी अवघ्या 78 धावांवर संपूर्ण टीम पॅव्हेलियनमध्ये परतला. यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 354 धावांची मोठी आघाडी मिळण्यास मदत झाली. इंग्लिश कर्णधार जो रूटने सामन्यात यजमान ब्रिटिश संघासाठी शानदार शतक झळकावले आणि टीम इंडियावर तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेतली.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबल (Photo Credit: icc-cricket.com/)

दरम्यान, मालिकेची चौथी कसोटी आता 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान लंडनच्या द ओव्हल मैदानात खेळली जाणार आहे. शिवाय मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आहे आणि पुढील कसोटी जिंकणारा संघ मालिकेत विजयी आघाडी घेईल. त्यामुळे चौथी टेस्ट मॅच नक्कीच रंगतदार होईल. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विनला पहिल्या तीन सामन्यातून वगळणे टीम इंडियासाठी मोठ्या चिंतेचे कारण बनले आहे. अशास्थितीत चौथ्या कसोटी सामन्यात तरी टाइम इंडिया अश्विनला संधी देते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

Tags

ENG vs IND ENG vs IND 2021 ENG vs IND 3rd Test ENG vs IND 3rd Test Day 4 England Cricket Team England vs India England vs India 2021 England vs India 3rd Test England vs India 3rd Test Day 4 England vs India Leeds Test 2021 ICC World Test Championship ICC World Test Championship 2021-23 ICC World Test Championship 2021-23 Points Table ICC World Test Championship Points Table ICC WTC 2021-23 Points Table ICC WTC Points Table IND vs ENG IND vs ENG 3rd Test IND vs ENG 3rd Test Day 4 IND vs ENG Leeds Test India vs England India vs England 3rd Test India vs England 3rd Test Day 4 India vs England Leeds Test 2021 Indian Cricket Team Team India आयसीसी डब्ल्यूटीसी 2021-23 पॉइंट टेबल आयसीसी डब्ल्यूटीसी पॉइंट्स आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इंग्लंड क्रिकेट टीम इंग्लंड विरुद्ध भारत इंग्लंड विरुद्ध भारत 2021 इंग्लंड विरुद्ध भारत 3rd टेस्ट 2021 इंग्लंड विरुद्ध भारत लीड्स टेस्ट 2002 इंग्लंड विरुद्ध हेडिंग्ले टेस्ट 2021 टीम इंडिया भारत विरुद्ध इंग्लंड भारत विरुद्ध इंग्लंड 3rd टेस्ट 2021 भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स टेस्ट 2002 भारत विरुद्ध इंग्लंड हेडिंग्ले टेस्ट 2021 भारतीय क्रिकेट टीम हेडिंग्ले