ICC World Cup 2019: 'प्रत्येकाला आपल्या आवडल्या संघाला प्रोत्साहन देण्याचा अधिकार आहे', मेहबूबा मुफ्ती यांचे IND vs PAK मॅचवर ट्वीट

बहरतीया संघाने पाकिस्तान समोर 337 धावांच लक्ष्य दिले आहे.

(Photo credits-Facebook)

मॅन्चेस्टर (Manchester) येथे भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे (People's Democratic Party) (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी रविवारी चाहत्यांना त्यांच्या पसंतीच्या संघाला प्रोत्साहन करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) च्या माजी मुख्यमंत्री मुफ्तीनी दोन्ही संघाना त्यांच्या शुभेच्छा देत सांगितले की प्रत्येक व्यक्तीस जो संघ आवडतो त्यास प्रोत्साहन करण्याचा त्यांना अधिकार आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा आणि विराट कोहलीची धमाकेदार खेळी, भारताचं पाकसमोर 337 धावांचं आव्हान)

"आजच्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यातील सर्वोत्तम संघ जिंको. प्रत्येक व्यक्तीला त्यांचा आवडत्या संघाला प्रोत्साहन देण्याचा अधिकार आहे. तर आपण याबद्दल गंभीर होऊ नये, असे मुफ्ती ट्विट करत म्हणाल्या.

भारत-पाक सामना हा मॅन्चेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मध्ये खेळवला जात आहे. बहरतीया संघाने पाकिस्तान समोर 337 धावांच लक्ष्य दिले आहे. या सामन्यादरम्यान रोहित शर्माने शतकी पारी खेळली.