ICC World Cup 2019: माइकल वॉन म्हणाला जो कोणी या संघाचा पराभव करेल तोच विश्वकप चा खरा दावेदार
इंग्लंड चा माजी कर्णधार मायकल वॉन ने वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे कौतुक केले आहे. वॉन ट्विट करत म्हणाले, "जो कोणी भारताला हरवेल तो विश्वचषक जिंकेल".
आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये सेमीफायनलसाठी संघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आता पर्यंत ऑस्ट्रेलिया (Australia) चा संघ विश्वकपच्या सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. आणि अजून तीन जागा रिक्त आहे. ICC गुणतालिका पाहता भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) चा संघ सेमीफायनमध्ये पोहचणार हे पक्क आहे. टीम इंडिया आपल्या प्रभावी खेळीमुळे विश्वकपचा प्रबळ दावेदार मानला जातोय. इंग्लंड चा माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) ने वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे कौतुक केले आहे. (IND vs WI मॅचदरम्यान वीरेंद्र सेहवाग ने विचारला टीम इंडिया आणि प्रत्येक चाहत्याला टोचणारा प्रश्न, पहा Post)
वॉन ट्विट करत म्हणाले, "जो कोणी भारताला हरवेल तो विश्वचषक जिंकेल". भारत आतापर्यंत स्पर्धेतील एकमेव नाबाद संघ आहे. टीम इंडिया ने आपली 6 पैकी 5 सामने जिंकले आहे तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारताचा पुढील सामना यजमान इंग्लंड (England) शी होणार आहे. इंग्लंडला नामवंत संघ विश्वकप च्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. शिवाय, इंग्लंडची सेमीफायनलची वाट बिकट करू शकतो. इंग्लंडला सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना उरलेले दोन्ही मॅच जिंकावे लागतील. इंग्लंडच्या या दोन मॅच भारत आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध आहे. ८ पॉईंट्ससह इंग्लंड सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
विश्वकपच्या सेमीफायनलमधील चौथ्या स्थानासाठी स्पर्धाच सुरु आहे. यात बांगलादेश (Bangladesh), श्रीलंका (Sri Lanka), पाकिस्तान (Pakistan) सारखे संघ शामिल आहे. वेस्ट इंडिजला नामवंत भारतीय संघानं सलग पाचवा विजय नोंदवला. दरम्यान,अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या टीम सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झाल्या आहेत. भारतविरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव झाला तर याचा थेट फायदा पाकिस्तानला होऊ शकतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)