ICC World Cup 2019: ENG vs AUS सामन्याआधीच इंग्लंड चा 'Master Stroke', मिशेल स्टार्क चा सामना करण्यासाठी घेतली अर्जुन तेंडुलकर ची मदत
अर्जुन ने इंग्लंडच्या स्पिन बॉलिंग सल्लागार सक्लेन मुश्ताक यांच्या देखरेखीखाली गोलंदाजी केली.
इंग्लंड (England) मध्ये चालू असलेल्या आयसीसी (ICC) विश्वकप 2019 अजून रोमांचक वळण घेत आहे. बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तान (Pakistan) संघाने आपले मागील सामने जिंकून सेमीफायनल ची चुरस अजून रोमांचकारी केली आहे. आजच्या सामन्यात यजमान इंग्लंड आणि गत जेते ऑस्ट्रेलिया (Australia0 संघाचा सामना लॉर्ड्स (Lords0 च्या मैदानात खेळ जाईल. आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलिया पुन्हा पहिल्या क्रमांकावर तर इंग्लंड स्थानी पोहचू शकेल. मात्र, ऑस्ट्रेलिया साठी हा सामना जिंकणे इतके सोप्पे नाही. ऑस्ट्रेलियाई जलद गोलंदाजां चा सामना करण्यासाठी तयार कारणासाठी भारताचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मुकाबल्यात इंग्लंडच्या फलंदाजाला मदत करत आहे. (इम्रान खान च्या सहाय्यकाने शेअर केला पाकिस्तानी पंतप्रधानांऐवजी सचिन तेंडुलकर चा फोटो; Netizens ने हास्यास्पद मिम्स द्वारे केल ट्रोल)
अर्जुन ने इंग्लंडच्या स्पिन बॉलिंग सल्लागार सक्लेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांच्या देखरेखीखाली गोलंदाजी केली. सरावादरम्यान चे काही फोटो सोशल मीडिया वर वायरल होत आहे. या फोटोत अर्जुन नारंगी रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे.
आजवर अर्जुन ने आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केलं आहे. इंग्लंडमध्ये एमसीसी (MCC) यंग क्रिकेटर्स टीमकडून खेळताना पुन्हा एकदा अर्जुन चर्चेत आला. अर्जुन ने सरे (Surrey) च्या खेळाडूला अत्यंत भेदक अशा बॉलवर माघारी धाडलं. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.