Hrithik Shokeen Quick Facts: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध IPL पदार्पण केलेल्या मुंबई इंडियन्सच्या या यंगस्टरबद्दल तुम्हाला माहिती असणाऱ्या सर्व आवश्यक बाबी जाणून घ्या

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने लेग-स्पिनर मुरुगन अश्विनची जागा घेतली आहे. या क्रिकेट कारकिर्दीतील हे निश्चितपणे सर्वात मोठे पाऊल आहे. दरम्यान, हृतिक शोकीनबद्दल काही झटपट तथ्ये खालीलप्रमाणे आहेत.

हृतिक शोकीन (Photo Credit: Instagram)

Hrithik Shokeen Quick Facts: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्धच्या आयपीएलच्या 33 व्या सामन्यात माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने हृतिक शोकीन (Hrithik Shokeen) याला आयपीएल (IPL) पदार्पणाची संधी दिली आहे. जगातील सर्वात मोठ्या टी-20 स्पर्धांपैकी एकामध्ये चमकण्याची संधी मिळालेल्या भारतीय तरुणांच्या यादीतील तो नवीनतम प्रवेशकर्ता असेल आणि यंदाच्या हंगामात आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबईला त्याच्याकडून अविस्मरणीय कामगिरीची अपेक्षा असेल. मुंबई इंडियन्सचा या हंगामात सहा सामन्यांत एकही विजय मिळवू शकलेला नाही आहे आणि शोकीन अशा खेळाडूंपैकी एक ठरू शकतो जो आपल्या संघाचे नशीब बदलू शकतो. (IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ 85 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला, ब्रावोचा चेन्नईला दिलासा)

उजव्या हाताचा ऑफ-स्पिनर जो बॅटने देखील योगदान देण्यास सुलभ असलेला शोकीन तुलनेने नवीन असून त्याने 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध भारत अंडर-23 संघात लिस्ट A मध्ये पदार्पण केले होते. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने लेग-स्पिनर मुरुगन अश्विनची जागा घेतली आहे. मुंबई इंडियन्सकडे या मोसमात कोणताही वरिष्ठ आघाडीचा फिरकी पर्याय नाही आणि शोकीनने पदार्पणात चांगली कामगिरी केल्यास तो कायमस्वरूपी हे स्थान काबीज करू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज सारख्या संघाविरुद्ध शोकीन चमकेल आणि संधीच सोनं करणं अपेक्षित आहे. तसेच या क्रिकेट कारकिर्दीतील हे निश्चितपणे सर्वात मोठे पाऊल आहे. दरम्यान, हृतिक शोकीनबद्दल काही झटपट तथ्ये खालीलप्रमाणे आहेत:

1. हृतिक शोकीनचा जन्म 14 ऑगस्ट 2000 रोजी दिल्लीत झाला.

2. त्याने 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध भारतीय U-23 संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

3. त्या सामन्यात त्याने 10 षटकात 2/32 अशी आकडेवारीची नोंद केली होती.

4. त्याचा शेवटचा सामना 20 नोव्हेंबर 2019 रोजी आशियाई क्रिकेट कौन्सिल इमर्जिंग टीम्स कप विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध होता.

5. आयपीएल 2022 च्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने 2 लाख रुपयांत करारबद्ध केले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif