How to Download Hotstar & Watch MI vs RCB IPL 2021 Match 1: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल मॅच पाहण्यासाठी हॉटस्टार कसं डाउनलोड कराल? जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामाचा थरार आजपासून सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएलचा सलामीचा सामना रंगणार आहे. कोविड-19 पुन्हा एकदा देशभरात पाय पसरवत असल्याने यंदा मात्र चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे, चाहत्यांना आयपीएलचा आनंद घ्यायचा असेल तर Disney+ Hotstar एक उत्तम पर्याय आहे.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: File Image)

How to Download Hotstar & Watch MI vs RCB IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामाचा थरार आजपासून सुरु होणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स  (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएलचा (IPL) सलामीचा सामना रंगणार आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आजचा सामना खेळला जाणार आहे. मागील वर्षी कोरोना व्हायरसच्या जगभरातील प्रसारामुळे युएई येथे स्थलांतरी झालेले इंडियन प्रीमियर लीग यंदा संपूर्णपणे भारतात आयोजित केले जाणार आहे. मात्र, कोविड-19 पुन्हा एकदा देशभरात पाय पसरवत असल्याने यंदा मात्र चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद घेता येणार नाही. अशास्थितीत आयपीएल चाहत्यांना घरी बसून आयपीएलचा आनंद घ्यायचा असेल तर Disney+ Hotstar हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. (IPL 2021 Marathi Commentary: आयपीएल च्या 14 चा सीजनाचा मराठीतून घ्या आनंद; 'हे' दिग्गज खेळाडू करणार कॉमेंट्री)

हॉटस्टार एक लोकप्रिय ऑनलाइन डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्म आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपटांसह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडिओ कन्टेन्ट उपलब्ध आहे. Disney+ Hotstar यंदा आयपीएलचे स्ट्रीम पार्टनर आहेत. आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील आयपीएलचा सलामीचा सामना खेळला जाईल. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.

2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. आता, आपल्या अ‍ॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अ‍ॅपचे चिन्ह दिसेल.

4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अ‍ॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.

5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

हॉटस्टार अ‍ॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये उपलब्ध आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now