LSG vs MI T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी? दोन्ही संघांची येथे पाहा आकडेवारी

या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

LSG vs MI T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी? दोन्ही संघांची येथे पाहा आकडेवारी
LSG vs MI (Photo Credit - Twitter)

Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 16 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) येथे संध्याकाळी 7.30 खेळवला जाणार आहे. या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

हेड टू हेड रेकाॅर्ड (LSG vs MI Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. या काळात, लखनौ सुपर जायंट्सने वरचढ कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने पाच सामने जिंकले आहेत. तर, मुंबई इंडियन्सने फक्त एकच सामना जिंकला आहे. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच लढत असेल. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघ दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले होते आणि दोन्ही सामने लखनौ सुपर जायंट्सने जिंकले होते. मुंबई इंडियन्स यावेळी पुनरागमन करू इच्छितात.

हे देखील वाचा: LSG vs MI IPL 2025 16th Match Live Streaming: आज लखनौ आणि मुंबई भिडणार, किती वाजता सुरु होणार सामना? कुठे पाहणार लाईव्ह? वाचा संपूर्ण तपशील

लखनौच्या 'या' खेळाडूंनी मुंबई इंडियन्सविरुद्ध केला आहे कहर

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने मुंबई इंडियन्सविरुद्ध 16 सामने खेळले आहेत. ऋषभ पंतने आपल्या 16 डावांमध्ये 26.80 च्या सरासरीने आणि 139.58 च्या स्ट्राईक रेटने 402 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतने मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 अर्धशतकेही झळकावली आहेत. ऋषभ पंत व्यतिरिक्त, निकोलस पूरनने मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 सामन्यांमध्ये 176.72 च्या स्ट्राईक रेटने 205 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, लेग स्पिनर रवी बिश्नोईने मुंबई इंडियन्सविरुद्ध 10 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत.

लखनौविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूंनी केला कहर

मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 6 सामने खेळले आहेत. या काळात, सूर्यकुमार यादवने 15.66 च्या खराब सरासरीने एकूण 94 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त, अनुभवी फलंदाज रोहित शर्माने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 6 सामन्यांमध्ये 27.50 च्या सरासरीने आणि 142.24 च्या स्ट्राईक रेटने 165 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, ट्रेंट बोल्टने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 5 सामन्यात 7.00 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटसह 8 विकेट्स घेतल्या आहेत.

एकाना स्टेडियमवर दोन्ही संघांची कामगिरी 

लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत 15 सामने खेळले आहेत. या काळात लखनौ सुपर जायंट्सने सात सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, त्यांना 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय, 1 सामना बरोबरीत सुटला. या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा सर्वोत्तम स्कोअर 199 धावा आहे. मुंबई इंडियन्सने या मैदानावर दोन सामने खेळले आहेत. या काळात मुंबई इंडियन्सने दोन्ही सामने गमावले आहेत. या मैदानावर मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम धावसंख्या 172 धावा आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2025 04:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).