Happy Birthday Yuvraj Singh: दोन विश्वचषकांचा हिरो, कॅन्सरवर केली मात, 43 वर्षांचा झाला टीम इंडिया सर्वात मोठा सामना विजेता!

2007 टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल एमएस धोनीच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक होत, परंतु युवीने ते विजेतेपद जिंकण्यासाठी झंझावती खेळी केली. इंग्लंडविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात 16 चेंडूत 58 धावांची खेळी. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत खेळलेल्या 30 चेंडूत 70 धावांची अप्रतिम खेळी.

(Photo Credits: Getty Images)

Happy Birthday Yuvraj Singh: सहा चेंडूत सहा षटकार. 12 चेंडूत अर्धशतक. 2011 च्या विश्वचषकातील मालिकावीर खेळाडू. आणि असे किती अविस्मरणीय क्षण युवराज सिंगने (Yuvraj Singh) भारतीय क्रिकेटला दिले कुणास ठाऊक. 2007 टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल एमएस धोनीच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक होत, परंतु युवीने ते विजेतेपद जिंकण्यासाठी झंझावती खेळी केली. इंग्लंडविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात 16 चेंडूत 58 धावांची खेळी. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत खेळलेल्या 30 चेंडूत 70 धावांची अप्रतिम खेळी. भारताला टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी ही खेळी होती. चार वर्षांनंतर, एकदिवसीय विश्वचषकातही युवीने बॅट आणि बॉलने इतकी चांगली कामगिरी केली होती, ज्याच्या जोरावर तो जागतिक क्रिकेटमधील सर्वात आवडता खेळाडू बनला. युवराज आज त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.

टीम इंडिया 2007 मध्ये टी-20 चॅम्पियन बनली

2007 मध्ये टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण स्पर्धेत युवीची कामगिरी अप्रतिम होती. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या महत्त्वाच्या सामन्यात युवीने जोरदार फटकेबाजी केली. डावखुऱ्या फलंदाजाने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सलग सहा चेंडूंत सहा षटकार मारून इतिहास रचला होता. युवीने केवळ 12 चेंडूत अर्धशतक केले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात युवीच्या खेळीने सामन्याचा मार्ग पूर्णपणे बदलून टाकला. युवराजने 30 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी करत कांगारूंच्या भक्कम गोलंदाजीचा धुव्वा उडवला.

2011 च्या विश्वचषकातील संस्मरणीय कामगिरी

2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात युवराजची कामगिरी हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण मानला जातो. युवी या स्पर्धेत केवळ बॅटनेच नाही तर चेंडूनेही चमकला. मधल्या षटकांमध्ये येताना युवराजने अनेक महत्त्वाच्या भागीदारी मोडल्या. 9 सामन्यात युवराजने 90.50 च्या सरासरीने 362 धावा केल्या. युवीने या स्पर्धेत एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली. युवराजने मोठ्या सामन्यांमध्ये केवळ बॅटने धावा केल्या नाहीत तर तो चेंडूनेही चमकला. युवीने 9 सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. हे 15 विकेट सर्व मोठ्या फलंदाजांच्या होत्या. कॅन्सरमुळे मैदानावरील रक्ताच्या उलट्यांकडे दुर्लक्ष करून युवराजने देशासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले.

हे देखील वाचा: Yuvraj Singh: युवराज सिंग बनला विराट कोहलीचा शेजारी, अलिशान घराची किंमत वाचून माहितेय?

चौथ्या क्रमांकावर खेळताना युवराजने खेळल्या अनेक अप्रतिम खेळी 

दोन विश्वचषकाशिवाय युवराजने कारकिर्दीत अनेक मोठे टप्पे गाठले. चौथ्या क्रमांकावर खेळताना युवराजने अनेक अप्रतिम खेळी खेळल्या, ज्याची क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद आहे. युवीच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला चौथ्या क्रमांकासाठी त्याच्या क्षमतेचा एकही फलंदाज सापडलेला नाही. यामुळेच भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडू आणि त्यांच्या योगदानाबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा त्या यादीत युवराज सिंगचे नाव नक्कीच समाविष्ट होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now