Happy Birthday Roger Binny: जॅवेलिन थ्रोचा राष्ट्रीय विक्रम करणारा बिन्नी झाला क्रिकेटर, वाचा टीम इंडियाच्या पहिल्या World Cup विजयाचा शिल्पकार रॉजर बिन्नी च्या आयुष्यातील 10 मजेदार गोष्टी

1983 क्रिकेट वर्ल्ड कप विजयाचे नायक रॉजर बिन्नी हे भारतीय क्रिकेट संघात खेळणारे पहिले अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू. भारतीय क्रिकेटमधील हा अप्रसिद्ध नायकाचा आज 64 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिसानिमित्त जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

रॉजर बिन्नी (Photo Credit: ICC/Twitter)

आज आपण जेव्हा-जेव्हा 1983 मध्ये जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वकपची आठवण काढतो तेव्हा आपल्या समोर कपिल देव (Kapil Dev) लॉर्ड्स (Lords) मैदानावर विश्वकपची ट्रॉफी उंचावत असेलेला क्षण सामोरे येतो. यात अजिबात काही शंका नाही की कपिल यांच्या शानदार कामगिरीमुळे भारताला विजय मिळाला. पण भारताला फायनलमध्ये नेण्यास अजून एक खेळाडूचे मोठे योगदान आहे ज्याचे क्रेडिट त्याला कधीच प्राप्त झाले नाही. आणि तो खेळाडू म्हणजे रॉजर बिन्नी (Roger Binny). भारतीय क्रिकेट संघात खेळणारे पहिले अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू.

1983 च्या विश्वचषक स्पर्धेत बिन्नीने संपूर्ण स्पर्धेत 18 बळी घेतले होते. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सेमीफायनल सामन्यात बिन्नीने 8 ओव्हरमध्ये 2 निर्धाव ओव्हर आणि 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय क्रिकेटमधील हा अप्रसिद्ध नायकाचा आज 64 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिसानिमित्त जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी:

बालपणापासून होती खेळाची आवड

बिन्नी एक नैसर्गिक ऍथलीट होते. आपल्या युवा वयात त्यांनी अनेक खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. एकेकाळी त्यांनी जॅवेलिन फेकण्याचा राष्ट्रीय विक्रम देखील आपल्या नावावर केला होता आणि शाळेच्या फुटबॉल आणि हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

एक संशोधक

बिन्नी भारतीय संघासाठी टेस्ट क्रिकेट खेळलेले पहिले अँग्रो-इंडियन होते. त्यांनी 1979 मध्ये बेंगळुरू येथे आयोजित टेस्ट सामन्याद्वारे टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

भारताच्या विश्वचषक विजयाचा नायक

1983 च्या विश्वचषक मोहिममध्ये कपिल देव यांनी पुढाकार घेत संघाचे नेतृत्व केले. पण बिन्नी, मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी संघाच्या विजयात अमूल्य योगदान केले. बिन्नी बॅटने काही खास प्रभावी कामगिरी करू शकले नाही पण त्यावेळी त्यांनी स्पर्धेत सर्वाधिक 18 विकेट्स पटकावण्याचा मान मिळवला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल सामान्य क्लाईव्ह लॉईड याची महत्वाची विकेट घेत टीमच्या विजयाचा पाय भक्कम केला.

खरे अष्टपैलू

त्यांचा आंतरराष्ट्रीय विक्रम कदाचित हे सिद्ध करू शकणार नाही, पण बिन्नी आपल्या वेळातील सर्वोत्तम अष्टपैलू होते. ते एक उत्कृष्ट फलंदाज होते आणि कर्नाटकसाठी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) मध्ये सलामीला देखील यायचे. घरात अपरिहार्य परिस्थितीत अथकपणे बॉलिंग करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. ते एक विलक्षण क्षेत्ररक्षक देखील होते.

कर्नाटकचे विश्वसनीय क्रिकेटपटू

1975-76 ते 1989-90 पर्यंत कर्नाटकच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक, बिन्नीने बर्याचदा त्याच्यासाठी फलंदाजीची सुरुवात केली. त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपापला बेस्ट 211 नाबाद धावांची नोंद केली होती. बिन्नी यांनी केरळा विरुद्ध संजय देसाई यांच्या सोबत फलंदाजीची सुरुवात करत हा विक्रम केला होते. शिवाय त्यांनी आणि देसाई यांनी 451 धावांची भागीदारी देखील केली. आजवर क्रिकेटमध्ये इतक्या धावांच्या भागीदारीचा विक्रम कोणी मोडू शकला नाही. कर्नाटकासाठी बिन्नी यांनी 71 प्रथम श्रेणीचे सामने खेळले. यात त्यांनी 43.50 च्या सरासरीने 4,394 धावा केल्या. यात त्यांनी 12 शतक आणि 21 अर्धशतक केले आहेत.

उत्कृष्ट कोच

बिन्नी हे 2000 च्या अंडर-19 विश्वचषक विजेता संघाचे प्रशिक्षक होते. यात त्यांनी मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह यांना मोठा स्टार बनण्यात सहाय्य केले. त्यानंतर त्यांना बंगाल रणजी संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आणि नंतर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) चा भाग बनले.

राष्ट्रीय निवडक

2012 मध्ये बिन्नी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीच्या पाच सदस्यांपैकी एक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

स्टुअर्टची निवड

रॉजर निवड समितीत असताना त्यांचा मुलगा स्टुअर्ट (Stuart Binny) याची इंग्लंड (England) विरूध्द नॉटिंगहॅम (Nottingham) टेस्टमध्ये भारतीय संघात निवड करण्यात आली होती. स्टुअर्टच्या निवडीसह नेपोटीझमचा प्रश्न उपस्थित केला गेला. पण रॉजर यांनी असे सांगितले की, प्रत्येक वेळी जेव्हा स्टुअर्टची निवड करणे किंवा न करणे याबद्दल निर्णय घेतला जायचा त्यावेळी ते खोली सोडून जायचे आणि त्याच्या सहकार्यांच्या निर्णयावर निर्णय सोपवायचे.

बाप तसा मुलगा

रॉजर प्रमाणेच, त्याचा मुलगा स्टुअर्ट देखील उजव्या हातातील वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू आहे. स्टुअर्टचा प्रथम श्रेणी आणि वनडे क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉलचा रेकॉर्ड त्याच्या वडिलांच्या तुलनेत थोडासा चांगला आहे. योगायोगाने, वनडे सामन्यांमध्ये भारतीय जलद गोलंदाजांनी जेव्हा-जेव्हा सर्व 10 बळी घेतले आहेत, त्या सामन्यातील तीनमध्ये बिन्नी खेळाला होता.

एक विचित्र संयोग

बिन्नी यांच्या तिन्ही फॉरमॅट मधल्या पहिल्या आणि अंतिम सामन्यांमध्ये एक आगळा-वेगळा संयोग दिसून येतो. बिन्नी यांनी पहिला आणि शेवटचा वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला तर टेस्टमधील पहिला आणि अंतिम सामना पाकिस्तान विरुद्ध होता. आणि खरं तर, पाकिस्तानविरुद्ध हे दोन्ही सामने बेंगळुरू येथे खेळण्यात आले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement