'देवच तुमचे नशीब ठरवतो' असे म्हणत Yuvraj Singh पुन्हा क्रिकेटमध्ये एन्ट्री करणार असल्याची दिली हिंट (Video)

भारतीय संघाचा माजी धडाकेबाज फलंदाजीपटू आणि आपल्या गोलंदाजीने सर्वांचा धुव्वा उडवणारा युवराज सिंह (Yuvraj Singh) पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे. याबद्दल त्याने स्वत: एक पोस्ट करत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री करणार असल्याची हिंट दिली आहे.

युवराज सिंह (Photo Credits: Getty Images)

भारतीय संघाचा माजी धडाकेबाज फलंदाजीपटू आणि आपल्या गोलंदाजीने सर्वांचा धुव्वा उडवणारा युवराज सिंह (Yuvraj Singh) पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे. याबद्दल त्याने स्वत: एक पोस्ट करत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री करणार असल्याची हिंट दिली आहे. परंतु नेमका युवराज कोणत्या टूर्नामेंट मध्ये खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केलेले नाही. पण त्याने देवच तुमचे नशीब ठरवतो असे म्हटले आहे.(Most Successful Captain in T20Is: इंग्लंडचा Eoin Morgan ठरला T20Is मधील सर्वात यशस्वी कर्णधार; MS Dhoni आणि Asghar Afghan यांना टाकले मागे)

युवराज सिंह हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या व्यतिरिक्त अन्य खेळाडूंसारखे रोड सेफ्टी सीरिज मध्ये खेळण्याची चर्चा सुरु आहे. युवराज याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने त्याच्या अखेरच्या इंटरनॅशनल शतकाचा व्हिडिओ पोस्ट करत त्याला बॉलिवूड मधील प्रसिद्ध गाणे 'तेरी मिट्टी भी' वाजत आहे.

पोस्ट शेअर करत युवराज याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''देवच तुमचे नशीब ठरवतो. फेब्रुवारी महिन्यात चाहत्यांच्या डिमांडमुळे पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद याच्यासाठी आभार. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. नेहमीच मला पाठिंबा देत राहिलात आणि हेच खऱ्या चाहत्याची निशाणी आहे.''(ENG vs SL, T20 World Cup 2021: इंग्लंडची विजयी घोडदौड सुरु, श्रीलंकेचा 26 धावांनी पराभव करून सलग चौथ्या विजयासह सेमीफायनल मध्ये धडक)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

दरम्यान, युवराज सिंह याने 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो ग्लोबल कनाडा टी-20 लीग आणि रोड सेफ्टी सीरिज मध्ये खेळताना दिसून आला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now