Players Retirement In T20 World Cup 2024: रोहित-कोहलीपासून ते डेव्हिड वॉर्नरपर्यंत, 'या' खेळाडूंनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केले अलविदा

या विश्वचषकात केवळ रोहित शर्मा आणि विराट कोहलीच नाही तर इतर काही दिग्गज क्रिकेटपटूंनीही क्रिकेटला अलविदा केलं आहे.

Rohit, Kohli And Warner (Photo Credit - X)

ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024)  भारतीय चाहत्यांसाठी खूप आनंददायी होता. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संघाने विश्वचषक जिंकल्याचा एकीकडे चाहते आनंदी असतानाच दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्तीने सर्वांनाच दु:खी केले. टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतरच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या विश्वचषकात केवळ रोहित शर्मा आणि विराट कोहलीच नाही तर इतर काही दिग्गज क्रिकेटपटूंनीही क्रिकेटला अलविदा केलं आहे. या विश्वचषकातून निवृत्त झालेले खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊया.

रोहित शर्मा (Rohit Sharma)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 टी-20 विश्वचषक जिंकला. रोहितनेही विश्वविजेता होताच निवृत्ती जाहीर केली. रोहितने केवळ टी-20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली. विराट कोहलीप्रमाणे तोही कसोटी आणि वनडे खेळताना दिसणार आहे.

विराट कोहली (Virat Kohli)

भारताने 2024 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर, विराट कोहलीने पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. कोहलीने सांगितले की, हा त्याचा शेवटचा टी-20 विश्वचषक आणि भारतासाठी शेवटचा टी-20 सामना होता. विराटने केवळ टी-20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती जाहीर केली. तो कसोटी आणि वनडेमध्ये खेळताना दिसणार आहे.

हे देखील वाचा: PM Modi Special Thanks Rahul Dravid: 'अतुलनीय कोचिंग कौशल्यामुळे यशाला आकार मिळाला'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राहूल द्रविडचे कौतुक, एक्सवर पोस्ट शेअर

डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यापूर्वीच निवृत्ती घेतली होती. त्यानंतर, ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषक 2024 मधून बाहेर पडताच वॉर्नरने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा केला. अशा प्रकारे वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली.

ट्रेंट बोल्ट

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टही यावेळी त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा टी-20 विश्वचषक खेळला. हा त्याचा शेवटचा टी-20 विश्वचषक असेल, असे बोल्टने विश्वचषकादरम्यानच सांगितले होते.