Cricketers Sexist Or Racist Remarks: वर्णद्वेषी-लैंगिक टिप्पणीमुळे संकटात सापडले हे 5 क्रिकेटपटू, या प्रसिद्ध भारतीय खेळाडूंचाही यादीत समावेश
जिथे क्रिकेट आहे तिथे वाद होतातच. जगातील अनेक खेळाडू वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अलीकडेच लैंगिक आणि वर्णभेद टिप्पणीचा ट्रेंडने अनेकांचे लक्ष वेधले आहे. आज आपण अशाच काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे वर्णद्वेषी-लैंगिक टिप्पणीमुळे संकटात सापडले आहेत.
Cricketers Sexist Or Racist Remarks: क्रिकेट आणि वाद हातात हात घालून जातात. जिथे क्रिकेट आहे तिथे वाद होतातच. जगातील अनेक खेळाडू वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बॉल टॅम्परिंग विवाद हे एक उदाहरण आहे ज्याने सिद्ध केले की आपल्या चुकीमुळे एक नामांकित क्रिकेट खेळाडू देखील अडचणीत येऊ शकतो. अलीकडेच लैंगिक (Sexist) आणि वर्णभेद (Racist) टिप्पणीचा ट्रेंडने अनेकांचे लक्ष वेधले आहे. वेस्ट इंडीज (West Indies) संघाने क्रिकेटपटूंच्या त्वचेच्या रंगामुळे होणाऱ्या अनादरविरोधात एकत्रित आवाहन केले आहे. त्यांनी ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ ची परंपरा सुरू केली. आज आपण अशाच काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे वर्णद्वेषी-लैंगिक टिप्पणीमुळे संकटात सापडले आहेत. (ENG vs NZ 1st Test: पदार्पणाच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजाकडून 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटबद्दल दिलगीरी; म्हणाला 'ते वक्तव्य लज्जास्पद आणि खजील करणारे')
1. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)
‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये सेक्सिस्ट टिपण्यामुळे टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू मोठ्या अडचणीत सापडला होता. हे प्रकरण चांगलंच गाजले होतं. चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने हार्दिकला त्याचा जवळचा मित्र आणि भारतीय संघातील साथीदार केएल राहुल सोबत कार्यक्रमात आमंत्रित केले होते. हार्दिकची महिलांवरील टिप्पणी इतकी सेक्सिस्ट होती की त्यामुळे त्याला 2019-2020 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत पाठवले गेले. दोघांवर प्रत्येकी 20 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यांना टिप्पण्यांसाठी ‘माफीनामा’ द्यावा लागला.
2. सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed)
पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू अँडिल फेहलुक्वायो याच्यावरील वर्णद्वेषी टीकेमुळे अडचणीत सापडला. 2019 डरबन दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसर्या वनडे सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाजाने त्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूविरोधात वर्णद्वेषी टीका केली. पीसीबीने चार सामन्यांची बंदीची कारवाई केल्यावर त्याने ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आणि फेहलुक्वायोने “पुरेशी दयाळू” वृत्ती दाखवत माफी स्वीकारली.
3. हरभजन सिंह (Harbhajan Singh)
माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्स आणि भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह यांच्यातील 2007-08 भारताच्या डाऊन अंडर दौऱ्यावरील मंकीगेट प्रकरण भरपूर गाजले होते. भज्जीने आपल्याला ‘माकड’ म्हणून संबोधले असल्याचा सायमंड्सने दावा केला होता. वर्णभेदाची टीका केली म्हणून हरभजनवर तीन सामन्यांसाठी बंदी घातली गेली. प्रकरण इतके वाढले होते की भारताने हरभजनवर लादलेल्या बंदी विरोधात अपील दाखल केले आणि दौरा सोडून जाण्याची इशारा दिला होता. या प्रकरणात सचिन तेंडुलकरची साक्ष घेतली गेली ज्यानंतर भज्जीवरील बंदी उठवण्यात आली.
4. ओली रॉबिन्सन (Ollie Robinson)
इंग्लंडचा नवोदित क्रिकेटर ओली रॉबिन्सन या यादीत नवीन नुकताच सामील झाला आहे. आठ वर्षांपूर्वी केलेल्या काही वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्विट्समुळे रॉबिनसन अडचणीत सापडला आहे. जरी तो ई-सुरक्षित असल्याचा दावा करीत असला तरी त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत. या क्रियाकलापांविरूद्ध इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या शून्य-सहिष्णुतेच्या धोरणानुसार चुकीबद्दल त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.
5. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)
गावस्करांच्या अनुष्का शर्मावरील टिप्पण्यांचे प्रचंड चुकीचे अर्थ व वर्णन केले गेले. त्यांच्या टीकेला अपमानकारक व लैंगिक संबंध समजले गेले ज्यांनंतर त्यांनी अनुष्का शर्माने माजी भारतीय कर्णधाराला पत्र लिहून निराशा व्यक्त केली. लैंगिक वर्तनामुळे अडचणीत सापडलेल्या खेळाडूंमध्ये गावस्कर यांचाही समावेश होतो.