IPL 2021: महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जबाबत माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचे धक्कादायक विधान
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील चौथ्या सामन्यात चेन्नईचा संघ 30 सप्टेंबरला सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबरला राजस्थान रॉयल्स, 4 ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटल्स सोबत खेळणार आहे. त्यानंतर त्यांचा शेवटचा सामना 7 ऑक्टोबरला पंजाब किंग्स बरोबर रंगणार आहे. त्यानंतर प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.
आयपीलच्या मागील हंगामात निराशाजनक कामगिरी करणारा महेंद्र सिंह धोनीचा (MS Dhoni) संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नईने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवून 16 गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. चेन्नईने प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. मात्र, याचदरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा (Brian Lara) यांनी चेन्नईच्या संघाबाबत एक विधान केले आहे, जे ऐकल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला आहे.
दरम्यान, ब्रायन लारा यांनी असे म्हटले आहे की, "आयपीएलमधील इतर संघांनी चेन्नई सुपर किंग्जच्या काही कमजोरीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजेत. चेन्नईच्या काही कमजोरी आहेत, जिथे तुम्ही विरोधी टीम म्हणून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. आम्ही पहिल्या सामन्यात चेन्नईला पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध फलंदाजी करताना पाहिले आहे. या सामन्यात मुंबईने चेन्नईला चार वेळा बॅकफूटवर ढकलले, असे मला वाटते." हे देखील वाचा- How to Download Hotstar & Watch SRH vs RR IPL 2021 Match Live: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? संपूर्ण प्रक्रिया घ्या जाणून
आयपीएलच्या दुसऱ्या लेगच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. दरम्यान, चेन्नईच्या संघाची खराब सुरुवात झाली असताना सलामीवर ऋतुराज गायकवाडने संघाचा डाव सावरला. ज्यामुळे संघाला 140 धावापर्यंत मजल मारता आली. परंतु, या लक्ष्यचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईचा डगमगताना दिसला. दरम्यान, मुंबईच्या सौरभ तिवारीने अर्धशतक ठोकूनही संघाचा पराभव झाला.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील चौथ्या सामन्यात चेन्नईचा संघ 30 सप्टेंबरला सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबरला राजस्थान रॉयल्स, 4 ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटल्स सोबत खेळणार आहे. त्यानंतर त्यांचा शेवटचा सामना 7 ऑक्टोबरला पंजाब किंग्स बरोबर रंगणार आहे. त्यानंतर प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)