IndVsWI : 181 धावांवर वेस्ट इंडिजचा पहिला डाव आटपला, भारताने दिली फॉलोऑनची संधी
भारताने वेस्ट इंडिजला फॉलोऑन खेळण्याची संधी दिली आहे.
राजकोट : भारत - वेस्टइंडीज दरम्यान सुरु असलेल्या टेस्ट सीरिज दरम्यान तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ १८१ धावांवर ऑल आउट झाला आहे. आर अश्विन ने शेनन गैब्रिएलची विकेट घेतली. शेनन गैब्रिएल केवळ १ रान बनवू शकला आहे. वेस्टइंडीज 468 धावा मागे आहे. भारताने वेस्ट इंडिजला फॉलोऑन खेळण्याची संधी दिली आहे.
पहिल्या डावात अश्विन ने ४ विकेट्स घेतल्या आहेत. तर वेस्ट इंडिज कडून रोस्टन चेसने सर्वाधिक 53 आणि कीमो पॉल ने 47 रन बनवले आहेत. वेेस्टइंडीज 181/10 (48 ओवर) मध्येच पॅव्हेलियनमध्ये परत गेली.
भारतीय फलंदाजाच्या दमदार कामगिरी नंतर टी ब्रेक पूर्वी भारताने पहिला डाव ६४९ धावांवर घोषित केला. सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु असलेल्या या खेळामध्ये भारतासमोर वेस्ट इंडिजची दमझाक होत आहे.
भारताच्या पहिल्या डावामध्ये विराट कोहलीने 139, पृथ्वी शॉने 134, जडेजाने नाबाद 100, चेतेश्वर पुजारा ने 86 धावा करून मोठा स्कोर उभा केला आहे.