England's 5th Test Likely Playing XI: इंग्लंडला मालिका ड्रॉ करण्याची अंतिम संधी, मँचेस्टरवर या 11 धुरंधरांसह मैदानात उतरू शकते ब्रिटिश टीम
इंग्लंड विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिका आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा आघाडी आहेत तर ब्रिटिश संघाकडे मालिका अनिर्णित करण्याची शेवटची संधी आहे. पाचव्या सामन्यात इंग्लंड संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये अधिक बदल करताना दिसत नाही आहे.
England's 5th Test Likely Playing XI: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) संघातील कसोटी मालिका आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा आघाडी आहेत तर ब्रिटिश संघाकडे मालिका अनिर्णित करण्याची शेवटची संधी आहे. मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर दोन्ही संघात विजय मिळवण्यासाठी चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या निर्णायक सामन्यासाठी यजमान संघात जोस बटलर (Jos Buttler) आणि जॅक लीच (Jack Leech) यांचा समावेश करण्यात आला असून सॅम बिलिंग्सला सिलीज करण्यात आले आहे. बटलर यापूर्वी आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर बसला होता. दुसरीकडे, टीम इंडियाकडे 14 वर्षानंतर इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे यजमान संघ आपला सर्व ताकदीचा संघ घेऊन मँचेस्टरच्या मैदानावर उतरेल हे नक्की. (IND vs ENG 5th Test: टीम इंडिया इंग्लंडमधील 14 वर्षांचा वनवास मालिका विजयाने संपविण्याच्या तयारीत; MS Dhoni, गांगुली यांनीही केला होता प्रयत्न)
मालिकेतील नॉटिंगहम येथील सामना पावसाने खराब केला तर लॉर्ड्सवर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने मागून येत जोरदार विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंडने देखील जोरदार कामगिरी करत तिसरा सामना खिशात गाठला आणि मालिकेत बरोबरी साधली. पण चौथ्या सामन्यात संघाचा फलंदाजी क्रम अपयशी ठरला परिणामी भारताने आघाडी घेतली. आता पाचव्या सामन्यात इंग्लंड संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये अधिक बदल करताना दिसत नाही आहे. रोरी बर्न्स आणि हसीब हमीद सलामीला उतरतील. तर डेविड मलान तिसऱ्या स्थानावर कायम राहील. तसेच चौथ्या सामन्यात बॅटने प्रभाव पाडण्यात फेल झालेला इंग्लिश कर्णधार जो रूट पुन्हा आपल्या जुन्या लयीत परतण्यासाठी उत्सुक असेल. जॉनी बेअरस्टो पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरेल. शिवाय जोस बटरलला संधी मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल कारण ओव्हलवर ओली पोपने बॅटने चांगली भूमिका बजावली होती. मोईन अली संघात अष्टपैलूची भूमिका बजावेल. दरम्यान, इंग्लंडने संकेत दिले आहेत की ते मँचेस्टरमध्ये एक विशेषज्ञ फिरकीपटू खेळू शकतात कारण त्यांनी लीचला संघात सामील केले आहे. याशिवाय क्रिस वोक्स ओली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन वेगवान गोलंदाजीची धुरा संभाळती. तर क्रेग ओव्हरटनच्या जागी जॅक लीचला संधी मिळू शकते.
इंग्लंडचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन- जो रूट (कॅप्टन), रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जो ओली पोप, जॉनी बेअरस्टो/ जोस बटलर, मोईन अली, क्रिस वोक्स, जॅक लीच, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)