IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी इंग्लंडने केले पुनरागमन, ऑली पोपने झळकावले शतक; बुमराहने घेतल्या तीन विकेट

दुसऱ्या दिवसाच्या खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने तीन विकेट गमावून 209 धावा केल्या आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. तर इंग्लंडकडून हॅरी ब्रूक (0) आणि ऑली पोप (100) धावांवर खेळत आहे.

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी इंग्लंडने केले पुनरागमन, ऑली पोपने झळकावले शतक; बुमराहने घेतल्या तीन विकेट
IND vs ENG (Photo Credit- X)

England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताचा पहिला डाव 471 धावांंवर आलऑऊट झाला. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शतके झळकावली. तर, इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्स प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. त्यानंतर, दुसऱ्या दिवसाच्या खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने तीन विकेट गमावून 209 धावा केल्या आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. तर इंग्लंडकडून हॅरी ब्रूक (0) आणि ऑली पोप (100) धावांवर खेळत आहे.

जयस्वाल, गिल आणि पंतचे दमदार शतक

पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने सुरुवाच चांगली केली आणि पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. भारताकडून यशस्वी जयस्वाल (101), कर्णधार शुभमन गिल (147) आणि ऋषऊ पंतने (134) धावा केल्या. तर केएल राहुलने 42 धावांचे योगदान दिले. गिल आणि पंतने मिळून 209 धावांची मोठी भागीदारी रचली. बाकी कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

हे देखील वाचा: Rishabh Pant Century: शतक झळकावून ऋषभ पंतने इंग्लंडच्या भूमीवर रचला इतिहास, धोनीचा विक्रम काढला मोडीत

बेन स्टोक्सने घेतल्या चार विकेट

इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने महत्वाच्या 4 विकेट घेतल्या. त्याने यशस्वी, सुदर्शन, करुण नायर आणि शार्दुल ठाकूर यांना बाद करून भारताच्या गतीला काही ब्रेक लावला. त्याच वेळी, ब्रायडन कार्सने 4 विकेट घेतल्या. जोश टंग आणि शोएब बशीर यांनी 1-1 विकेट घेतली. सुरुवातीला इंग्लंडची गोलंदाजी कमकुवत होती पण स्टोक्सने एका टोकावरून दबाव आणून पुनरागमन केले. आता इंग्लंड तिसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. तर भारताला

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2025 11:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).