ENG Squad for WI Tour 2023: विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेट 'अॅक्शन मोड'मध्ये, 9 खेळाडू संघातून बाहेर
इंग्लंडचा संघ सातव्या स्थानावर राहिला आणि शेवटचे दोन सामने जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपले स्थान निश्चित केले.
गतविजेता म्हणून 2023 च्या विश्वचषकात दाखल झालेल्या इंग्लंड क्रिकेट संघाची (England Team) कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. इंग्लिश संघ 9 पैकी 6 सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला असून गुणतालिकेत संघ अफगाणिस्तानच्या खाली राहिला आहे. इंग्लंडचा संघ सातव्या स्थानावर राहिला आणि शेवटचे दोन सामने जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र असे असतानाही संघाची निराशाजनक कामगिरी कोणीही विसरू शकणार नाही. आता इंग्लंड क्रिकेटनेही यावर कारवाई केली आहे. (हे देखील वाचा: IND vs NED ICC World Cup 2023 Toss Update: भारताने नेदरलँड्सविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय)
9 खेळाडूंना वगळण्यात आले
विश्वचषक स्पर्धेनंतर इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाईल, जिथे ते तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. ही मालिका 3 डिसेंबरपासून सुरू होणार असून 21 डिसेंबरपर्यंत हा दौरा सुरू राहणार आहे. पण विशेष बाब म्हणजे 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघापेक्षा खूप वेगळा संघ आता या मालिकेसाठी जाहीर करण्यात आला आहे. या नव्या संघातून 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत संघासोबत असलेले 9 खेळाडू वगळण्यात आले आहेत. जे रूट, जॉन बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेविड मलान, मार्क वुड, डेव्हिड विली अशी अनेक नावे या संघात नाहीत. यापैकी एक-दोन खेळाडूंना टी-20 संघात स्थान मिळाले आहे, परंतु सर्वच एकदिवसीय संघाबाहेर आहेत.
इंग्लंडचा संघ
एकदिवसीय संघ- जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, गुस ऍटकिन्सन, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जेस क्रॉली, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, ऑली पोप, फिल सॉल्ट, जोश टॉंग, जॉन टर्नर .
टी-20 संघ- जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, गुस ऍटकिन्सन, हॅरी ब्रूक, मोईन अली, सॅम कुरन, बेन डकेट, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, टायमल मिल्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टोंग, रीस टोपले, जॉन टर्नर , ख्रिस वोक्स.