IND vs NED ICC World Cup 2023 Toss Update: भारताने नेदरलँड्सविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
दोन्ही संघांमधील विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला असुन न्यूझीलंडविरुद्ध भारताचा सामना 15 तारखेला मुंबईत होणार आहे.
आज विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) भारत विरुद्ध नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळतील. दोन्ही संघांमधील विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला असुन न्यूझीलंडविरुद्ध भारताचा सामना 15 तारखेला मुंबईत होणार आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत, त्याचवेळी नेदरलँडचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन
CWC 2023. India won the toss and elected to bat. https://t.co/jiX03YxcSN #INDvNED #CWC23
— BCCI (@BCCI) November 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

