ENG vs WI 3rd Test: वेस्ट इंडीजविरुद्ध तिसर्या टेस्टसाठी बेन स्टोक्सला मिळू शकते विश्रांती, इंग्लंडचे प्रशिक्षकाने दिले संकेत
पण, इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनी शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या सामन्यात स्टोक्सला विश्रांती मिळण्याचे संकेत दिले आहेत. मॅचेस्टरच्या पहिल्या डावात स्टोक्सने 176 आणि दुसऱ्या डावात नाबाद 78 धावा केल्या.
मॅन्चेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत इंग्लंडने (England) तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. आता 24 जुलै, शुक्रवारपासून अंतिम सामना याच मैदानावर खेळला जाईल. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) तुफान खेळीच्या जोरावर विंडीजविरुद्ध इंग्लंडने 113 धावांनी विजय मिळवला. मॅचेस्टरच्या पहिल्या डावात स्टोक्सने 176 आणि दुसऱ्या डावात नाबाद 78 धावा केल्या. त्याने एकूण 254 धावांसह 3 गडी बाद केले आणि इंग्लंडचा विजय निश्चित केला. मात्र, आता मालिकेच्या निर्णायक सामन्यात स्टोक्स पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. पण, इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनी शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या सामन्यात स्टोक्सला विश्रांती मिळण्याचे संकेत दिले आहेत. (ICC Test Rankings: आयसीसी अष्टपैलू रँकिंगमध्ये बेन स्टोक्स एक नंबरी, वेस्ट इंडिज कर्णधार जेसन होल्डरची दुसऱ्या स्थानी घसरण)
"आम्ही शक्य तितक्या त्याला बाहेर हवा आहे कारण प्रत्येकजण हे पाहू शकतो की तो किती चांगला आहे. परंतु आपल्याला काय आहे, आम्ही स्टोक्सला विश्रांती देण्यावर विचार करणार आहोत. तो आता शेवटच्या दोन सामान्यांपासून खेळत आहे आणि तो ठीक आहे याची आम्हाला खात्री करायची आहे. परंतु जर तो तंदुरुस्त आणि निरोगी असेल तर तो खेळू शकेल," सिल्व्हरवूडने वृत्तसंस्था AFPच्या वृत्तानुसार नमूद केले.
343 धावा आणि 9 विकेटसह स्टोक्स या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आणि विकेट घेणारा खेळाडू आहे. मॅन्चेस्टरमध्ये खेळला जाणारा मालिकेतील अंतिम सामना जिंकण्याचे आवाहन दोन्ही टीम्ससमोर असणार आहे. विंडीजविरुद्ध मालिकेनंतर इंग्लंडचा सामना आयर्लंड आणि पाकिस्तानशी होणार आहे. आणि या मालिकेत स्टोक्सची उपस्थिती इंग्लंडसाठी महत्वपूर्ण ठरेल, त्यामुळे तिसऱ्या सामन्यात स्टोक्सला विश्रांती दिली जाऊ शकते. क्रिस वोक्स आणि सॅम कुर्रानच्या उपस्थित असल्याने इंग्लंड स्टोक्सला विश्रांती देण्याचा धोका पत्करू शकते. दुसरीकडे, गोलंदाजांमध्ये यजमान टीमकडे जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन आणि मार्क वूड यांच्या रूपात फ्रेश पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे, या तिघांपैकी कोणाला तिसऱ्या सामन्यात संधी मिळते हे पाहणे उत्साहाचे ठरेल.