ENG vs WI 1st Test: टॉस दरम्यान जेसन होल्डरला पडला ICC च्या नियमांचा विसर, कॉमेंटेटर देखील लागले हसू, पाहा व्हिडिओ
यजमान इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या टेस्ट सामन्यातील दरम्यान त्याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडे शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला. स्टोक्सने शेकहॅंड करण्याऐवजी हाताची मुठ्ठी बंद करुन पुढे केला, ज्यानंतर होल्डरला अचानक आयसीसीचा नियम लक्षात आला जे पाहून होल्डर आणि स्टोक्ससह कॉमेंटेटरांना देखील हसू आले.
साउथॅम्पटनमध्ये बुधवारपासून इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. तब्बल 116 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार कसोटी मालिकेला सुरुवात झाली, पण सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीजचा कर्णधार नाणेफेक जेसन होल्डर (Jason Holder) वेळी आयसीसीचे (ICC) नवे नियम जवळजवळ विसरला मात्र आपली चूक लक्षात येताच त्याने स्वतःला सारवले. यजमान इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या टेस्ट सामन्यातील अधिकांश वेळ पावसाने व्यत्यय आणला ज्यामुळे पहिल्या दिवशी 17.4 ओव्हरचाच खेळ झाला. खेळाचे पहिले सत्रही पावसामुळे धुतले गेले. पण, नाणेफेक दरम्यान होल्डरने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडे (Ben Stokes) शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला. (ENG vs WI 2020: क्रिकेट इज बॅक! रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेसह दिग्गजांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वागत, भारतीय फलंदाजांनाही पुनरागमनाची प्रतीक्षा)
स्टोक्सने शेकहॅंड करण्याऐवजी हाताची मुठ्ठी बंद करुन पुढे केला, ज्यानंतर होल्डरला अचानक आयसीसीचा नियम लक्षात आला जे पाहून होल्डर आणि स्टोक्ससह कॉमेंटेटरांना देखील हसू आले. ही घटना समोर येताच प्रसारक म्हणाले, "तुम्ही असे करू शकत नाही, काही हरकत नाही, आता आपले हात स्वच्छ करा." दरम्यान, टॉस जिंकून इंग्लंडने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या घटने दरम्यान ब्रॉडकास्टर मैदानावर हजर नव्हता, पण कॅमेरा आणि माईकच्या माध्यमातून तो संपूर्ण घटनेचा तपशील देत होता.
पाहा हा व्हिडिओ:
दरम्यान, खेळपट्टी ओली असल्याने सामना तीन तास उशिराने सुरू झाला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ केवळ 17.4 ओव्हरचा झाला. मात्र, वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएल याने दमदार सुरुवात केली आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये डॉम सिब्लेला त्रिफळाचीत करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबवण्यात आला. सात चेंडू फेकल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली ज्यामुळे दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)