ENG vs NZ ICC CWC 2019 Final: इंग्लंडची ऐतिहासीक कामगिरी, न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत पहिल्यांदा जिंकले विश्वचषक जेतेपद

इंग्लंडने सुपर-ओव्हरमध्ये न्यूझीलंडला पराभूत केले.

(Photo by Michael Steele/Getty Images)

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स (Lords) मैदानावर ऐतिहासिक कामगिरी करत इंग्लंड संघाने पहिल्यांदा आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक चे जेतेपद मिळवले आहे. इंग्लंडने सुपर-ओव्हरमध्ये न्यूझीलंडला पराभूत केले. सुपर-ओव्हर देखील टाय झाली आणि इंग्लंड संघ सर्वाधिक बाऊंड्रीजच्या आधारावर विजयी झाला.  लॉर्ड्स मैदानावर रंगलेल्या सामन्यात इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांचा सामना टाय झाला. दोन्ही संघांनी निर्धारीत षटकात 241 धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना इंग्लंडला एकच धाव काढता आली. इंग्लंडसाठी सुपर ओव्हरमध्ये बटलर आणि स्टोक्स यांनी 15 धावा करत किवी फलंदाजांसमोर जिंकण्यासाठी 16 धावांचे लक्ष ठेवले. यजमान इंग्लंडची जोस बटलर (Jos Buttler) ने 84 तर बेन स्टोक्स (Ben Stokes) ने 84 धावा केल्या. तर न्यूझीलंडसाठी कॉलिन डे ग्रँडहोम (Colin de Grandhomme) याने 10 ओव्हरमध्ये 25 धावा देत 1 विकेट घेतली.  (NZ vs ENG World Cup 2019 Final मॅचमध्ये जो रुट आणि केन विलियमसन फेल, रोहित शर्माने सर्वाधिक धावा करत जिंकली 'गोल्डन बॅट')

टॉस जिंकत न्यूझीलंडने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला पण त्यांच्या फलंदाजांना चांगली बॅटिंग करता आली नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत किवी फलंदाजांवर आपले वर्चस्व होते. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 241 धावा केल्या. किवी संघासाठी हेन्री निकोलस (Henry Nicholls) चांगली फलंदाजी करत 55 धावा केल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेसॉन रॉय (Jason Roy) 17 धावांवर बाद झाला. मॅट हेन्री (Matt Henry) याने रॉयला माघारी धाडत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर जो रूट (Joe Root) देखील स्वस्तात बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) लागोपाठ आपली विकेट गमावून बसले. बटलर आणि स्टोक्स यांनी सावध फलंदाजी करत डाव सावरला पण मोक्याच्या क्षणी बटलर 59 धावांवर बाद झाला.