ENG vs AUS, ICC CWC 2019 Semi-Final: इंग्लंड संघाला विजयासाठी 224 धावांचे लक्ष, स्टिव्ह स्मिथ याची एकाकी झुंज

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेत यजमान इंग्लंडला जिंकण्यासाठी 224 धावांचे लक्ष दिले. ऑस्ट्रेलियासाठी माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने एकाकी लढा दिला.

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पारंपरिक प्रतीस्पर्धी ऑस्ट्रेलिया (Australia)-इंग्लंड (England) यांच्यात एजबस्टन (Edgbaston) येथे रोमांचक सामना सुरु आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेत यजमान इंग्लंडला जिंकण्यासाठी 224 धावांचे लक्ष दिले. ऑस्ट्रेलियासाठी माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने एकाकी लढा दिला. मिशेल स्टार्स (Mitchell Starc) ने स्मिथला चांगली साथ दिली आणि संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडायला मदत केली. स्मिथने 119 चेंडूत 85 धावा केल्या तर स्टार्कने 36 चेंडूत 29 धावा केल्या. (ENG vs AUS, World Cup Semi-Final 2019: जोफ्रा आर्चरची प्राणघातक गोलंदाजी, अॅलेक्स केरी याच्या हनुवटीतुन निघाले रक्त, पहा (Video)

इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवाती पासून आपले वर्चस्व बनवून ठेवले. ऑस्ट्रेलिया संघाला पहिला फटका बसला तो कर्णधार ऐरोन फिंच (Aaron Finch) याच्या रूपात. जोफ्राआर्चर (Jofra Archer) यांच्या गोलंदाजीवर फिंच एलबीडब्ल्यू बाद झाला. तर ख्रिस वोक्स (Chris Woakes) याने डेविड वॉर्नर (David Warner) ची विकेट घेत इंग्लंड संघाला दुसरे यश मिळवून दिले. फिंच शुन्यावर बाद झाला. तर, वॉर्नर 10 धावांवर बाद झाला. आपला पहिला विश्वचषक सामना खेळात असलेला पीटर हैंड्सकॉम्ब (Peter Handscomb) देखील 4 धावा करत माघारी परतला. त्यानंतर स्मिथने अॅलेक्स कॅरी (Alex Carry) याच्या साथीने शतकी भागीदारी केली. कॅरी 46 धावांवर बाद झाला. स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांची भागिदारी चांगली सुरु असताना, आर्चरने मॅक्सवेलला 22 धावांवर बाद केले. मॅक्सवेल पाठोपाठ पॅट क्यमिन्स (Pat Cummins) देखील बाद झाला.

यजमान देशासाठी आर्चरने आपल्या 10 ओव्हरमध्ये केवळ 32 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर आदिल रशीद (Adil Rashid) याने 54 धावा देत 3 ऑस्ट्रेलियाई खेळाडूंना माघारी धाडले. वोक्स ने 8 ओव्हरमध्ये 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तब्बल 44 वर्षांनी सेमीफायनलचा सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघातून विजयी होणारी टीम फायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भिडेल. त्यामुळे कोणता संघ अंतिम फेरीत धडक मारणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now