CSK vs KKR, TATA IPL 2025 25th Match Live Score Update: केकेआरच्या गोलंदाजांपुढे धोनीची सेना ढेपाळली, कोलकाताला विजयासाठी मिळाले 104 धावांचे लक्ष्य
कोलकाताचे नेतृत्व अंजिक्य राहाणे (Ajinkya Rahane) करत आहे. तर, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावर आहे. दरम्यान, कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने कोलकातासमोर 104 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders, 25th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 25 वा सामना पाच वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे खेळवला जात आहे. दोन्ही संघ मागील सामन्यातील पराभव विसरुन मैदानात उतरणार आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अंजिक्य राहाणे (Ajinkya Rahane) करत आहे. तर, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावर आहे. दरम्यान, कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने कोलकातासमोर 104 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
केकेआरच्या गोलंदाजांपुढे धोनीची सेना ढेपाळली
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने 20 षटकात 9 गडी गमावून 103 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने 31 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याने 29 चेंडूत 3 चौकार मारले. त्याच्याशिवाय विजय शंकरने 29 धावांचे योगदान दिले. बाकी कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. कोलकाताला हा सामना जिंकण्यासाठी 104 धावा करायच्या आहेत.
सुनील नरेन घेतल्या सर्वाधिक 3 विकेट
दुसरीकडे, हर्षित राणाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून गोलंदाजीत सुनील नरेन सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीला प्रत्येती 2-2 विकेट मिळाल्या. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.