DC vs SRH, IPL 2019 Live Cricket Streaming and Score: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईज हैदराबाद संघाचा सामाना आज रंगणार, येथे पाहू शकता लाइव्ह
दिल्ली (Delhi) येथील फिरोज शाह कोटला मैदानावर (Feroz Shah Kotla Ground) आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) विरुद्ध सनराईज हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा सामना आज रंगणार आहे.
DC vs SRH, IPL 2019 Live Cricket Streaming and Score: आयपीएलच्या 12 व्या सिझनमधला दिल्ली (Delhi) येथे फिरोज शाह कोटला मैदानावर (Feroz Shah Kotla Ground) आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) विरुद्ध सनराईज हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा सामना आज रंगणार आहे. गेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाच्या पुढे हैदराबादच्या संघाला पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे आजचा सामन हैदराबादच्या संघासाठी जिंकणे म्हणजे अग्निपरिक्षेसारखा ठरणार आहे. तर आजचा सामना प्रेक्षकांना हॉटस्टारवर लाइव्ह पाहता येणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाचा दिल्लीमध्ये आज तिसरा सामना आहे. या मैदानावर दिल्लीच्या संघाला यापूर्वी विजय मिळवता आला होता. तर संघाने आयपीएलची सुरुवात मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर करत विजय मिळवला होता. तर हैदराबाद संघासमोर आजचा सामना जिंकणे आव्हानात्मक असणार आहे. त्याचसोबत हैदराबादचा संघ आता पर्यंत दोन सामने जिंकला असून एका सामन्यामध्ये त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.(हेही वाचा-IPL 2019, CSK vs RCB: आयपीएल काऊंटडाऊन सुरु; भारतासह जगभरात कोणत्या TV चॅनल्सवर पाहाल IPL सामने? घ्या जाणून)
संघातील संभावित खेळाडू:
दिल्ली कॅपिटल्स संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, अवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलिन मुनरो, क्रिस मोरिस, कगिसो रबादा, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, शिखर धवन, हनुमा विहारी, अक्षर पटेल, इशांत शर्मा, अंकुश बैंस, नाथू सिंह, कोलिन इंग्राम, शेरफेन रदरफोर्ड, कीमो पॉल, जलज सक्सेना, बंडारू अयप्पा.
सनराइजर्स हैदराबाद संघ: केन विलियम्सन (कर्णधार), डेविड वार्नर, अभिषेक शर्मा, जॉनी बेयरस्टो, खलील अहमद, रिकी भुई, बासिल थम्पी, श्रीवत्स गोस्वामी, मार्टिन गुप्टिल, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद नबी, शहबाज नदीम, टी. नटराजन, मनीष पांडे, यूसुफ पठान, राशिद खान, रिद्धिमान साहा, संदीप शर्मा, विजय शंकर, शाकिब अल हसन और बिली स्टेनलेक.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)