DC vs KXIP, IPL 2020: मोहम्मद शमी जबरदस्त गोलंदाजी; मार्कस स्टोइनिसच्या अर्धशतकाने दिल्लीचे पंजाबला 158 धावांचे आव्हान

मोहम्मद शमीने 4 ओव्हरमध्ये 15 धावा देत 3 विकेट घेतल्या. मार्कस स्टोइनिसने 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने धावा केल्या. स्टोइनिसच्या डावाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

मार्कस स्टोइनिस (Photo Credit: Twitter/DelhiCapitals)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या हंगामाच्या दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) किंग्स इलेव्हन पंजाबचे (Kings XI Punjab) आव्हान मिळाले. दिल्ली फलंदाजांनी हंगामातील पहिल्याच सामन्यात निराशा केली आहे. या सामन्यात पंजाबने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी निर्णय योग्य ठरवलं. पंजाबने निर्धारित 20 ओव्हरमध्ये दिल्लीला 157 धावांवर रोखले. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) 4 ओव्हरमध्ये 15 धावा देत 3 विकेट घेतल्या. शमीने टीमला सुरुवातीला मोठे विकेट मिवळून दिले ज्याने दिल्लीच्या धावसंख्येला रोखले. पंजाबकडून शमीव्यतिरिक्त भारताचा युवा गोलंदाज रवी बिश्नोईने (Ravi Bishnoi) पदार्पणाच्या सामन्यात 1 विकेट घेतली. युवा बिश्नोईने पदार्पणात पंतची विकेट घेतली. शेल्डन कॉटरेलने (Sheldon Cotttrell) 2 विकेट घेतल्या. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) अर्धशतक भागीदारी केली. श्रेयसने 32 चेंडूत 39 धावा केल्या. तर, पंतने 29 चेंडूत 31 धावा केल्या. मार्कस स्टोइनिसने (Marcus Stoinis) 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने धावा केल्या. स्टोइनिसच्या डावाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. क्रिस जॉर्डनच्या (Chris Jordan) अखेरच्या ओव्हरमध्ये स्टोइनिसने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 53 धावांवर रनआउट झाला. (DC vs KXIP, IPL 2020: पृथ्वी शॉ सोबत धाव घेताना शिखर धवन रनआऊट, दिल्लीच्या खराब कामगिरीने निराश Netizensने फटकारले)

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीला चांगली सुरुवात मिळाली नाही. दिल्लीकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी सावध सुरुवात केली. मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये शिखर शून्यावर धावबाद झाला. पृथ्वीसोबत गैरसमजामुळे धवन रनआऊट झाला. धवन पाठोपाठ तिसऱ्या ओव्हरमध्ये पृथ्वी देखील 5 धाव करून स्वस्तात माघारी परतला. फलंदाजीला आलेल्या हेटमायरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. शॉ बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर शिमरॉन हेटमायरने षटकार लगावला, मात्र शमीने त्या षटकाराचा बदला घेत पुढच्या चेंडूवर त्याची विकेट घेतली. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यावर श्रेयस आणि पंतने डाव सांभाळला. दोंघांनी काही मोठे शॉट्स लगावले, पण दोघेही मोठा डाव खेळू शकले नाही. श्रेयस आणि पंतने 76 धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या बिश्नोईने ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर पंतला बोल्ड केले. त्यानंतर पुढील ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शमीने श्रेयसला माघारी पाठवले. अय्यरने 32 चेंडूत 39 धावा केल्या तर, पंतने 29 चेंडूत 31 धावा केल्या. त्यानंतर दिल्ली संघाची घसरगुंडी सुरूच राहिली.

अक्षर पटेल 9 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. शेल्डन कॉटरेलने अक्षर पटेलला बाद केले आणि दिल्लीने 96 धावांवर 6 वी विकेट गमावली. रविचंद्रन अश्विनने 4 धावा केल्या. आजच्या सामन्यात दिल्लीच्या टीममध्ये अजिंक्य रहाणे तर पंजाबने क्रिस गेलला वगळले. दिल्ली आणि पंजाबमधील आजचा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही टीमचा आयपीएल 13 मधील हा पहिला सामना आहे, त्यामुळे दोघे विजयाने मोहिमेची सुरुवात करू पाहत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif