DC vs KKR IPL 2021 Match 25: Prithvi Shaw याची जबरा फलंदाजी, दिल्लीकडून कोलकाताचा 7 विकेटने दारुण पराभव
केकआरने दिलेल्या 155 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीने 3 विकेट गमावून 16.3 ओव्हरमध्ये एकतर्फी विजय मिळवला. दिल्लीसाठी पृथ्वीने सर्वाधिक 82 धावांची अर्धशतकी खेळी केली.
DC vs KKR IPL 2021 Match 25: पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi capitals) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 7 विकेटने दारुण पराभव केला आहे. केकआरने (KKR) दिलेल्या 155 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीने 3 विकेट गमावून 16.3 ओव्हरमध्ये एकतर्फी विजय मिळवला. दिल्लीसाठी पृथ्वीने सर्वाधिक 82 धावांची अर्धशतकी खेळी केली. शिखर धवनने (Shikhar Dhawan) 46 धावांचे योगदान दिले तर कर्णधार रिषभ पंतने 16 धावा केल्या. मार्कस स्टोइनिस 6 धाव करून नाबाद परतला. पृथ्वी आणि धवनच्या सलामी जोडीने पुन्हा एकदा शतकी भागीदारी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दुसरीकडे, कोलकाताच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजी पुढे शरणागती पत्करली. एकट्या पॅट कमिन्सने (Pat Cummins) 3 विकेट काढल्या. (IPL 2021: दिल्लीच्या Prithvi Shaw ची वेगवान अर्धशतकी खेळी, KKR विरोधात पडला षटकार-चौकारांचा पाऊस)
कोलकाता नाईट रायडर्सने आव्हानात्मक धावसंख्याचा पाठलाग करण्यासाठी धवन-शॉ यांची सलामी जोडी मैदानात उतरली. दोघांनी फटकेबाजी करत संघाला शानदार सुरुवात करून दिली. यादरम्यान, शॉने 18 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावलं आणि यंदाच्या मोसमात वेगवान अर्धशतक लगावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी पृथ्वीने शिवम मावीच्या एका ओव्हरमध्ये सलग सहा चौकार खेचले. पृथ्वी आणि धवनने 10.2 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 100 पार नेली. दोघे पुन्हा एक्स निघाला एकहाती विजय मिळवून देतील असे दिसत असताना कमिन्सने धवनला 14व्या षटकात शिखर धवनला पायचित करत तंबूत पाठवलं. यानंतर संघ विजयाच्या जवळ असताना कमिन्सने एकाच ओव्हरमध्ये पृथ्वी व पंतला माघारी धाडलं. कमिन्सच्या चेंडूवर चुकीचा फटका खेळत पृथ्वी झेलबाद झाला त्यानंतर पंतला बाउंड्री लाईनवर मावीकडे कॅच आऊट केलं.
यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 45 धावा केल्या तर शुबमन गिलने 43 धावांची खेळी केली. गिलची चांगली सलामी आणि डावाच्या उत्तरार्धात स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीमुळे कोलकाताने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. दुसरीकडे, दिल्लीकडून ललित यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.