दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंडविरुद्ध विजयावर भारतीय यूजरने केलेल्या कमेंटवर डेल स्टेन याने दिले सडेतोड उत्तर, पाहा Tweet

यावर आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने त्या यूजरला योग्य उत्तर दिले आणि त्याची बोलती बंद केली. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या विजयाबद्दल क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्रिया स्टेनला पातळी नाही आणि त्याने यूजरला मूर्ख म्हणत त्याच्या ट्विटला प्रतिसाद दिला.

डेल स्टेन (Photo Credits: Getty Images)

इंग्लंड (England) क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौर्‍यावर आहे. सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने 107 धावांनी शानदार विजय नोंदविला. या विजयासह प्रोटीसच्या संघाने आयसीसी (ICC) वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपले खाते उघडले. आफ्रिकेच्या या विजयावर एका यूजरने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली की घरच्या मैदानावर विजय मिळवणे सोपे आहे. यावर आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याने त्या यूजरला योग्य उत्तर दिले आणि त्याची बोलती बंद केली. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या विजयाबद्दल क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्रिया स्टेनला पातळी नाही आणि त्याने यूजरला मूर्ख म्हणत त्याच्या ट्विटला प्रतिसाद दिला. स्टेनने ट्विटरवर लिहिले की “प्रोटियसनी चांगले काम केले. मार्क आणि फाफ यांनी विजयाची भूक वाटणारी एक टीम एकत्र केली असल्याचे दिसते, कसे जिंकायचे आहे हे माहित आहे, परंतु शीर्षस्थानी आपल्या कौशल्याबद्दलच्या खऱ्या हेतूसह दिसत आहे. जेव्हा मी ग्रॅम स्मिथसह खेळायचो तश्याच खेळाडूंना पुनरागमन करताना पाहून बरे वाटले.” (SA vs ENG 1st Test: जेम्स अँडरसन याने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 150 व्या मॅचमध्ये पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट)

स्टेनच्या या पोस्टवर टिप्पणी देताना एका बहुधा भारतीय यूजरने लिहिले, "घरी खेळत आहेत, त्यामुळे चिंतामुक्त व्हा..." यूजरच्या या टिपणीनंतर स्टेनने त्वरित पलटवार करुन लिहिलं - “माझ्या मते, भारताचा भारतातील विजयही मग मोजला जाऊ नये, मी जे ट्विट केले त्यावरून तुमच्या ट्विटला काहीच अर्थ नाही... वेडा …" पाहा स्टेन आणि त्या यूजरमधील हे संभाषण:

स्टेनचा प्रतिसाद

दरम्यान, सेंन्चुरीअन स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 107 धावांनी शानदार विजय नोंदविला. आता मालिकेचा दुसरा सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाईल. हा विजय आफ्रिकेचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिला विजय आहे. संघाच्या या विजयाचा श्रेय खेळाडूंव्यतिरिक्त, नव्याने स्थापन झालेल्या क्रिकेट दक्षिण आफ्रिका व्यवस्थापनाचे आहे. माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ याला क्रिकेटचा अंतरिम संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले तर, माजी यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाउचर याने मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहे आणि माजी अष्टपैलू जॅक कॅलिस याला संघाचा बॅटिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले आहे.