CSK vs SRH IPL 2021 Match 23: सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला, पहा प्लेइंग इलेव्हन

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील (फिरोजशाह कोटला मैदान) हा पहिला सामना असणार आहे. आजच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

CSK vs SRH IPL 2021 Match 23: एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि डेविड वॉर्नरच्या (David Warner) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ आयपीएलच्या 23व्या सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील (फिरोजशाह कोटला मैदान) हा पहिला सामना असणार आहे. आजच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबई-चेन्नईमधील यशस्वी लेगनंतर आयपीएल आता दिल्ली व अहमदाबाद येथे पोहचले आहेत. चेन्नई आजचा सामना जिंकून विजयी पंच लगावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार असेल तर हैदराबादसमोर चेन्नईचा विजयरथ रोखण्याचे कठीण आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी दोन बदल करण्यात आलेले आहेत. (DC vs SRH IPL 2021: केन विल्यमसनच्या झुंजार अर्धशतकामुळे हैदराबादची दिल्लीशी बरोबरी; सीजनच्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये कॅपिटल्सने मारली बाजी)

हैदराबादने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. सनरायझर्सने विराट सिंह आणि अभिषेक शर्मा यांच्या जागी संदीप शर्मा व मनीष पांडेचा समावेश केला आहे. दुसरीकडे, चेन्नईने देखील आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केलेले आहेत. लुंगी एनगीडी व मोईन अली संघात परतले असून ड्वेन ब्रावो व इमरान ताहीरला बाहेर करण्यात आले आहे. दरम्यान, आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात दोनच संघ 14 वेळा आमनेसामने आले असून यमाचे चेन्नईने 10 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर फक्त 4 वेळा हैदराबादला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे मागील 13 वर्षाची आकडेवारी पाहता चेन्नईचा हैदराबादवर वरचष्मा दिसत आहे.

सीएसके प्लेइंग इलेव्हन: एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), रुतूराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, लुंगी एनगीडी.

सनरायझर्स प्लेइंग इलेव्हन: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), केन विल्यमसन, मनीष पांडे, विजय शंकर, केदार जाधव, राशिद खान, जगदीश सुचित, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif