CSK Vs RR IPL 2021 Match 12 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यातील आयपीएल सामना लाईव्ह कधी, कुठे आणि कसा पाहणार? घ्या जाणून
मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) हा सामना खेळला जाणार आहे.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 12व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्जचा संघ राजस्थान रॉयल्सलसोबत (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) भिडणार आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधार पद भारताचा युवा खेळाडू संजू सॅमसन याच्यावर सोपवण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता टॉस होईल. तसेच 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. चेन्नई विरुद्ध राजस्थान आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाईटवर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.
Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. सीएसके विरुद्ध आरआर यांच्यातील आयपीएलचा 12 वा सामना लाईव्ह प्रसारित करणार आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे देखील वाचा- DC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी
संघ
चेन्नई सुपर किंग्ज: रुतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, सॅम कुरान, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, कृष्णाप्पा गौथम, लुंगी एनगीडी, मिशेल सॅंटनर, रविश्रीनिवासन साई किशोर, हरी निशांत, एन जगदीसन, केएम आसिफ, हरिशंकर रेड्डी, भगथ वर्मा, जेसन बेहरेन्डॉर्फ
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन सकरिया, मुस्तफिजुर रहमान, अँड्र्यू टाय, श्रेयस गोपाळ, लियाम लिव्हिंगस्टोन , केसी करियप्पा, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे, अनुज रावत, कार्तिक त्यागी, कुलदीप यादव, यशस्वि जयस्वाल, आकाश सिंह
हॉटस्टार अॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आयपीएलचे सामने यंदा हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी आणि मराठी अशा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.