'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला; राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात 'No Ball' च्या निर्णयावर वाद (Watch Video)

त्याच्या मानधनातून 50% रक्कम कापण्यात आली आहे.

File image of MS Dhoni | (Photo Credits: IANS)

CSK Vs RR, IPL 2019:  आयपीएल सीझन 12 मध्ये यंदा अव्वल स्थानी असलेल्या चैन्नई सुपर किंग (Chennai Super Kings) या संघाने काल यजमान राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 4 विकेट्सने मात केली मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंग धोनी (M.S. Dhoni) डगआऊटमधून मैदानात आल्याने सध्या सोशल मीडियात त्याच्या रूद्रावताराची चर्चा सुरू आहे.

का चढला महेंद्रसिंग धोनीचा पारा?

महेंद्रसिंग धोनीची ओळखच मूळात 'कॅप्टन कूल' आहे. पण काल अखेरच्या ओव्हरमध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यामध्ये नो बॉल असूनही मैदानातील एका अम्पायरने नो-बॉल नसल्याचा इशारा केल्याने महेंद्र सिंग धोनी भडकला. उल्हास गंधे यांनी बेन स्टोक्सचा फुलटॉस बॉल नो-बॉल (Waist High No Ball) असल्याचं सांगितलं. सार्‍यांनीच हा प्रकार बघितला होता. मात्र नंतर मैदानात ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी हा बॉल 'नो-बॉल' नसल्याचा इशारा केल्याने धोनी वैतागला.

भडकलेला धोनी

सध्या धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. धोनी, अजिंक्य रहाणे आणि इतर खेळाडूदेखील अम्पायरसोबत होते. RCB vs MI, IPL 2019: सामन्यातील शेवटच्या बॉलवरुन वाद; RCB कर्णधार विराट कोहली भडकला (Viral Video)

काही वेळाने धोनी शांत झाला आणि मैदानाबाहेर पडला. मात्र त्याचा या वागण्यामुळे त्याच्या मानधनातून 50% रक्कम कापण्यात आली आहे. लेव्ह टू च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धोनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे.