CSK vs DC IPL 2021: Suresh Raina, सॅम कुरनच्या फटकेबाजीपुढे दिल्लीची दाणादाण, सुपर किंग्सने उभारला 188 धावांचा डोंगर

रैनाने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. चेन्नईकडून रवींद्र जडेजा नाबाद 26 धावा आणि असम कुरन 34 धावा करून परतला.

चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना (Photo Credit: Twitter/@IPL)

CSK vs DC IPL 2021 Match 2: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14च्या दुसऱ्या सामन्यात सुरेश रैनाचे (Suresh Raina) अर्धशतक आणि अखेरच्या क्षणी सॅम कुरनच्या (Sam Curran) फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) 189 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई आणि दिल्ली संघात आजचा सामना खेळला जात आहे. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडले पण सीएसकेने रैना, मोईन अली आणि अंबाती रायुडूच्या खेळीच्या जोरावर धावांपर्यंत मजल मारली. रैनाने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. मोईन अलीने 36 आणि रायुडूने 23 धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नाबाद 26 धावा आणि असम कुरन 34 धावा करून परतला. सॅम कुरन आणि जडेजा यांच्या सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीने संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. दुसरीकडे, दिल्लीकडून आवेश खान आणि क्रिस वोक्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले तर अश्विन आणि टॉम कुरन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (CSK vs DC IPL 2021 Match 2: चेन्नईविरुद्ध मैदानात उतरताच Rishabh Pant बनला आयपीएलचा 5वा युवा कर्णधार, पहा अन्य तरुण कॅप्टन्सची संपूर्ण लिस्ट)

नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या सुपर किंग्ससाठी फाफ डु प्लेसिस आणि रुतूराज गायकवाडची जोडी सलामीला उतरली. आयपीएल 14 मधील आपली पहिली ओव्हर टाकणाऱ्या आवेश खाने डु प्लेसिसला शून्यावर एलबीडबल्यू आऊट करत चेन्नईला मोठा झटका दिला. त्यानंतर वोक्सने सीएसकेच्या अडचणीत वाढ करत रुतुराजला स्लिपमध्ये कॅच आऊट केलं. पहिल्या दोन झटपट विकेट गमावल्यावर रैना आणि मोईन अलीने चेन्नईचा डाव सावरला. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली असताना मोठा फटका मारण्याच्या प्रतयनात मोईन 36 धावांवर कॅच आऊट झाला. एका टोकाला विकेट पडत असताना रैनाने आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. रैनाने 12व्या ओव्हरमध्ये अमित मिश्राच्या गोलंदाजीवर दोन षटकारांसह 17 धावा चोपल्या. रैनाने आयपीएलमध्ये वर्षानंतर जोरदार पुनरागमन करत षटकार खेचत 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. रायुडूच्या रुपात चौथा धक्का लागला तर धोनीला भोपळाही फोडता आला नाही.

दरम्यान, चेन्नईविरुद्ध आजचा समान युवा फलंदाज रिषभ पंतचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पहिलाच सामना आहे. श्रेयस अय्यरने दुखापतीमुळे यंदाच्या संपूर्ण आयपीएलमधून माघार घेतल्यावर पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif